चंद्रपूर जिल्ह्यातील तलावाच्या परिसरात Fodder Cultivation साठी तयार केलेली जमीन

चंद्रपूर जिल्ह्यात ५०२ तलावांच्या परिसरात चारा लागवड; ३.५७ लाख मेट्रिक टन उत्पादनाचे नियोजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 12, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात Fodder Cultivation म्हणजेच चारा लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ५०२ तलावांच्या परिसरातील उपलब्ध जमिनीवर चारा लागवड होणार आहे. विविध योजनांतून वैरण बियाणे वाटप करून सुमारे ३.५७ लाख मेट्रिक टन चारा उत्पादनाचे नियोजन आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे. (लाडक्या बहिणीसाठी धावले सुधीर भाऊ, वाचा बातमी)

५०२ तलावांच्या परिसरात Fodder Cultivation चे नियोजन

जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ५०२ तलावांच्या परिसरात उपलब्ध व योग्य जमिनीवर Fodder Cultivation चे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच विविध योजनांच्या माध्यमातून 4708 लाभार्थ्यांना वैरण बियाण्यांचा लाभ देऊन सुमारे 3 लाख 57 हजार मेट्रिक टन चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले आहे. चारा उत्पादनासोबतच उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, साठवणूक आणि योग्य व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात चारा लागवडीसाठी एकूण 502 तलावांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या तलावांच्या परिसरातील उपलब्ध व योग्य जमिनीवर विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन (व्ही.बी.जी- राम -जी) योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सहभागाने चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. चारा उत्पादनातून पशुधनाची गरज भागविण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

वैरण बियाणे वितरणातून 3.57 लाख मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित, Fodder Cultivation

पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादनासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2633 लाभार्थ्यांना 17 हजार 114 किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यातून 1 लाख 68 हजार 510 मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.

तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 2072 लाभार्थ्यांना 27 हजार 877 किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून 1 लाख 88 हजार 829 मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. अशा प्रकारे दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकूण 4708 लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून, 3 लाख 57 हजार 339 मेट्रिक टन चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले आहे.

चारा साक्षरता अभियानात शेतकऱ्यांना प्रशिक्षण, Fodder Cultivation

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाभर ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती तालुक्यातून करण्यात आली. अभियानांतर्गत कमी पाण्यात चारा लागवड, अझोला उत्पादन, निकृष्ट चाऱ्याची युरिया व एन्झाइम प्रक्रियेद्वारे पौष्टिकता वाढविणे, मुरघास निर्मिती तसेच हायड्रोपोनिक चारा उत्पादन यांसारख्या विषयांवर शेतकरी व पशुपालकांना प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वितरण, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पशुप्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा, बहुवार्षिक चारा पिकांसाठी अनुदान, विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप आणि मुरघास वितरण आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. आत्मा विभागामार्फत 2 लाख 40 हजार रुपये खर्चातून निकृष्ट चारा सकस करण्यासंबंधी 120 प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर पाच तलावांच्या परिसरात चारा लागवड, Fodder Cultivation

मृद व जलसंधारण विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील पाच तलावांची चारा लागवडीसाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही व वायगाव, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव तसेच भद्रावती तालुक्यातील आष्टी व काटवल तुकूम येथील तलावांचा समावेश आहे.

या ठिकाणी पंचायत विभाग, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि रोजगार हमी योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या उपक्रमातून उपलब्ध जलस्रोतांचा उपयोग करून स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविण्यासोबतच महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपूर जिल्ह्यात ५०२ तलावांच्या परिसरात चारा लागवड; ३.५७ लाख मेट्रिक टन उत्पादनाचे नियोजन”

Leave a Comment