चौगाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, Brahmapuri Crime प्रकरणाशी संबंधित प्रातिनिधिक छायाचित्र

आरोग्य केंद्रात डॉक्टरांना रुग्णाकडे जाण्यापासून रोखले; आठ जणांसह इतरांवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 12, 2026

ब्रह्मपुरी – Brahmapuri Crime अंतर्गत चौगाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना रुग्णाकडे जाण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादीनुसार हा प्रकार १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री घडला. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चौगाण येथील आठ जणांसह इतरांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम पुढील तपास करत आहेत. (मोबाईल रिसेट झाला आणि खात्यातील ६८ हजार रुपये गायब, फसवणुकीचा नवा प्रकार, वाचा बातमी)

चौगाण आरोग्य केंद्रात नेमके काय घडले? Brahmapuri Crime

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांसह काही मद्यपींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याची घटना घडली. ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Brahmapuri Crime काय घडलं १० नोव्हेम्बरच्या रात्री?

प्राप्त माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चौगाण येथील वंदना दादाजी अर्जुनकार या ६० वर्षीय महिला चक्कर आल्यामुळे आणि शुगर लेव्हल वाढल्यामुळे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या होत्या. त्यावेळी तेथील आरोग्य सेविका सुवर्णा चौधरी यांनी कर्तव्येवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनघा रमेश उंदीरवाडे यांना फोनवरून याची माहिती दिली. माहिती मिळताच डॉ. उंदीरवाडे या औषध निर्माण अधिकाऱ्यासह अवघ्या काही मिनिटांत रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या.

आरोग्य केंद्रात हुल्लडबाजी, Brahmapuri Crime

आरोग्य केंद्राच्या बाहेरील गेट उघडा असताना आतील चॅनेल गेट १० ते १२ जणांच्या समूहाने दुपट्ट्याने बांधून बंद केला होता आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाकडे जाऊ दिले जात नव्हते. महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने नम्रपणे आपल्याला रुग्णाला तपासू द्या, अशी विनंती केली असता, संबंधित इसमांनी आमचा पेशंट दगावला तरी चालेल, पण तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही, अशा धमकावणाऱ्या भाषेत हुज्जत घातली. यांतील बहुतांश लोकांच्या तोंडावरून दारूचा उग्र वास येत असल्याने ते मद्यपान करून आल्याचे स्पष्ट झाले.

मद्यधुंद अवस्थेतील या लोकांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत वैद्यकीय अधिकारी आणि उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या आवाजात धमकवण्यास सुरुवात केली. या हुल्लडबाजीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी अत्यंत भीतीदायक व असुरक्षित वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टर उंदीरवाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ मदत मागण्यासाठी आपत्कालीन क्रमांक ११२ वर कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींच्या धिंगाण्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. हा सर्व प्रकार रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होता.

Brahmapuri Crime: कोणत्या कलमांन्वये गुन्हा दाखल?

त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी न घाबरता धैर्याने रुग्णावर उपचार केले आणि प्रकृती सुधारल्यानंतर रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णाला तिच्या घरी सुखरूप सोडले. या प्रकरणानंतर आरोग्य सेविकेच्या मदतीने हुल्लडबाजी करणाऱ्यांची नावे निष्पन्न करण्यात आली. यामध्ये शिवाजी पत्रे, प्रफुल अर्जुनकार, रत्नाकर मेश्राम, मयूर देवघडे, रुपेश अर्जुनकार, शिवम कुंभारे, दादू मेघराज पत्रे, अंबादास अशोक देवारी आणि इतर सर्व रा. चौगाण यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद देण्यात आली. या तोंडी फिर्यादीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १२६(२), १८९(१)(ए), १८९(१)(ई), १८९(२), १९०, २२१ आणि ३२९(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखालाल भैय्यालल गौतम करत आहेत. शासकीय कर्तव्य बजावत असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment