चंद्रपूर : Horticulture Scheme म्हणजेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २०२६-२७ साठी निधीचा लक्षांक मिळाला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी एकूण ५० लाख २८ हजार रुपये निश्चित झाले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. फुलशेती, शेडनेट, पॉली हाऊस यांसारख्या घटकांचा यात समावेश आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात ५०२ तलाव परिसरात होणार चारा लागवड, वाचा बातमी)
Horticulture Scheme अंतर्गत ५० लाख २८ हजारांचा लक्षांक
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्याला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता एकूण 50 लाख 28 हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. या अभियानांतर्गत विविध फलोत्पादनविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
Horticulture Scheme अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती निधी?
या अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 30 लाख 27 हजार रुपये, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 20 लाख 1 हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या निधीतून पात्र शेतकऱ्यांना विविध फलोत्पादनविषयक घटकांसाठी योजनेच्या निकषांनुसार लाभ देण्यात येणार आहे.
फलोत्पादन अभियानात कोणत्या घटकांना लाभ?, Horticulture Scheme
या अभियानांतर्गत फुलशेती, मसाला पिके, विदेशी फळपिकांचा क्षेत्रविस्तार, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, औषधी वनस्पती लागवड, अळिंबी उत्पादन केंद्र, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस आणि प्लास्टिक मल्चिंग आदी घटकांचा समावेश आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फलोत्पादन क्षेत्राचा विकास करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय पॅक हाऊस, कांदाचाळ, फलोत्पादन यांत्रिकीकरण, शीतगृह, शीतखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रेफर व्हॅन आणि रायपनिंग चेंबर यांसारख्या प्रकल्पाधारित घटकांसाठीही योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत : योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘फलोत्पादन’ या घटकांतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. योजनेच्या अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध घटकांच्या लाभाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now








1 thought on “चंद्रपूर जिल्ह्याला फलोत्पादन अभियानात ५० लाख २८ हजारांचा लक्षांक; एससी-एसटी शेतकऱ्यांना महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन”