ब्रह्मपुरी येथील Forest Rights शिबिराची प्रातिनिधिक प्रतिमा

ब्रह्मपुरीत १३ नोव्हेंबरला वनहक्क शिबिर; चार तालुक्यांतील नागरिकांना दावे, अपील आणि दुरुस्तीची संधी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 12, 2026

चंद्रपूर – Forest Rights दाव्यांसाठी ब्रह्मपुरी येथे शुक्रवारी, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिर होणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, हे शिबिर सकाळी ११ वाजता स्वर्गीय राजीव गांधी सभागृह, ऊर्जा रोड येथे आहे. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर आणि सावली तालुक्यांतील नागरिकांना यात सहभागी होता येईल. नामंजूर दाव्यांवर अपील, जुन्या दाव्यांतील दुरुस्ती आणि नवीन दावे सादर करण्याची संधी मिळेल. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शिबिर आयोजित केले आहे. (आरोग्य केंद्रात युवकांची हुल्लडबाजी, ८ जणांवर गुन्हे दाखल, वाचा बातमी)

Forest Rights शिबिर: कधी, कुठे आणि कोणासाठी?

गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच वनहक्क (Forest Rights) पट्ट्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजयभाऊ वडेट्टीवार व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर व सावली या चार तालुक्यांतील वनहक्क, महसूल व अतिक्रमणधारकांना अधिकृत वनहक्क पट्टे मिळवून देण्याच्या दृष्टीने शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ब्रह्मपुरी येथील स्वर्गीय राजीव गांधी सभागृह ऊर्जा रोड ब्रह्मपुरी येथे सकाळी 11 वाजता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मा. शिवानी वडेट्टीवार यांच्या विशेष पुढाकारातून, जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे.

शिबिरात कोणत्या दाव्यांवर मार्गदर्शन मिळणार? Forest Rights

या शिबिरात वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांसंदर्भातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तांत्रिक त्रुटी, अपुरी कागदपत्रे अथवा अन्य कारणांमुळे नामंजूर झालेले दावे, प्रलंबित असलेले दावे तसेच अद्याप सादर न केलेले नवीन दावे याबाबत संबंधित नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय नामंजूर दाव्यांबाबत अपील सादर करणे, जुन्या दाव्यांमधील त्रुटींची दुरुस्ती करणे आणि नवीन दावे दाखल करण्याची प्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

वनहक्काचा प्रश्न हा हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी आणि त्यांच्या भवितव्याशी निगडित आहे. अनेक पात्र कुटुंबे आवश्यक माहितीचा अभाव, कागदपत्रांतील त्रुटी किंवा प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींमुळे आपल्या हक्कापासून दूर राहतात. अशा नागरिकांना एकाच ठिकाणी आपल्या दाव्यांबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.

गावागावांतून पात्र लाभार्थ्यांना सहभागी करण्याचे आवाहन, Forest Rights

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर व सावली तालुक्यांतील गावांमध्ये ज्या पात्र वनहक्कधारकांचे वैयक्तिक किंवा सामूहिक दावे नामंजूर झाले आहेत, प्रलंबित आहेत अथवा अद्याप दाखल झालेले नाहीत, अशा सर्व संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात उपस्थित राहावे. तसेच गावातील पात्र लाभार्थ्यांना या शिबिराची माहिती देऊन त्यांना सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

एकही पात्र वनहक्कधारक आपल्या हक्काच्या वनपट्ट्यापासून वंचित राहू नये, प्रत्येक पात्र कुटुंबाला न्याय मिळावा आणि वनहक्क दाव्यांमधील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर चारही तालुक्यांतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment