Chandrapur Crime: लालपेठ येथील ढाब्यात जळालेली मोटरसायकल

ढाब्यात घुसून बाईक पेटवली, चंद्रपुरातील घटना

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 13, 2026

चंद्रपूर – Chandrapur Crime मध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. लालपेठ परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील ढाब्यात पेट्रोल टाकून मोटरसायकल पेटवल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. (चंद्रपुरात खुलेआम जुगार, वाचा बातमी)

चंद्रपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून, लालपेठ परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या एका ढाब्यावर घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘मी या एरियाचा दादा आहे, माझी दहशत आहे’ अशी भाषा वापरत एकाने ढाब्यामध्ये घुसून थेट पेट्रोल टाकत चालकाची मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Chandrapur Crime: ढाब्यात नेमके काय घडले?

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शहरातील शिवाजी वार्ड, बल्लारशहा येथील बिटियस प्लॉट परिसरात राहणारा दिपेश रामखिलावन यादव हा तरुण आपल्या मोठ्या भाऊ दीपकसोबत गेल्या १५ वर्षांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ‘राधाकृष्ण’ नावाचा ढाबा चालवतो. दोघे मिळून हा व्यवसाय सांभाळतात. दरम्यान, गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर २०२६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिपक यादव नेहमीप्रमाणे ढाबा सुरू करण्यासाठी तिथे पोहोचला आणि त्याने आपली ‘एफझेड’ (FZ) कंपनीची निळ्या-लाल रंगाची मोटारसायकल (क्र. MH 34 CA 2377) ढाब्याच्या आत खुल्या जागेत पार्क केली होती.

१२ नोव्हेंबरला दुपारपासून सायंकाळपर्यंतचा घटनाक्रम, Chandrapur Crime

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लालपेठ येथील बायपास चौकात राहणारा साहील सिंग याने दिपेशला फोन करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच, म्हणजेच संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो साहील सिंग थेट त्या ढाब्यात शिरला. त्याच्या हातातील प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल त्याने दीपकच्या पार्क केलेल्या मोटरसायकलवर ओतले. “तू मला ओळखत नाही का? मी या एरियाचा दादा आहे, या एरियामध्ये माझी दहशत आहे, तुला जिवानिशी ठार मारतो,” असे म्हणत त्याने परिसरात दहशत निर्माण केली आणि स्वतःजवळ असलेल्या लाईटरच्या साहाय्याने त्या मोटरसायकलला आग लावून दिली व तिथून पसार झाला.

तक्रारीनुसार कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद?, Chandrapur Crime

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ढाब्यावर एकच खळबळ उडाली. मोटारसायकलने पेट घेतल्यामुळे बघता-बघता ती जळून खाक झाली, ज्यामुळे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीच्या ज्वाळा आणि धूर पाहून आजूबाजूचे लोक गोळा झाले. घटनेची माहिती मिळताच दिपेशने तातडीने ढाबा गाठून पाहिले असता त्याची मोटरसायकल पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आली. (Chandrapur Crime)

घाबरलेल्या व संतप्त झालेल्या दिपेश यादव याने या प्रकरणी त्वरित चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची सविस्तर तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी साहील सिंग विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३२६(फ), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण चंद्रू रामटेके करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी चक्रे वेगाने हलवली जात आहेत. दिवसाढवळ्या अशा प्रकारे ढाब्यात घुसून दहशत माजवणाऱ्या या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment