चंद्रपूर १९ नोव्हेंबर २०२६: चंद्रपूर इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शहर (जिल्हा) महिला काँग्रेस कमिटीतर्फे त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. गुरुवारी, १९ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव आणि महिला कमिटीच्या अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात इंदिरा गांधी यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
चंद्रपूर महिला काँग्रेसतर्फे पुतळ्यास माल्यार्पण, चंद्रपूर इंदिरा गांधी जयंती
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ‘आयर्न लेडी’ आणि भारतरत्न स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर (जिल्हा) महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या जडणघडणीत आणि कणखर नेतृत्वातून त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या विचारांची शिदोरी आजही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. (वाहनाच्या धडकेत वाघ जखमी, सिंदेवाही तालुक्यातील घटना, वाचा सविस्तर)
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव, शहर महिला (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे, गटनेता राजेश अडूर, झोन सभापती वैशालीताई चंदनखेडे, नगरसेविका सौ. संजीवनीताई वासेकर, नगरसेवक अभिषेक डोइफोडे, मनीष तिवारी, शालिनीताई भगत, मुन्नीबाजी, सौ. प्रतिभाताई पेंदोर, सौ. पायल दुर्गे, सौ. रेखा बारसगाडे, सौ. वर्षाताई बोथले, सौ. प्रिया अगडे, सौ. प्रियंका मोडक आणि सौ. पायल गडमवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आपल्या मनोगतात पदाधिकाऱ्यांनी इंदिराजींच्या प्रशासकीय कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा गौरव केला. कठीण प्रसंगांतही डगमगून न जाता देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले; महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विचारांवर चालत पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी महिला कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






