चंद्रपूर बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचे पोस्टर, चंद्रपूर बॉक्स क्रिकेट स्पर्धा

चंद्रपुरात २० नोव्हेंबरपासून व्यापाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा; ४० संघटनांचा सहभाग

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 19, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर बॉक्स क्रिकेट स्पर्धा २० ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दाताला येथील ‘द बिग बुल क्लब टर्फ’ येथे होणार आहे. फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (एफटीसीआय), चंद्रपूर यांनी या ‘ताडोबा अरण्यवास एफपीएल – सीझन १’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, व्यावसायिकांमध्ये संवाद, सहकार्य आणि स्नेहभाव वाढवण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. २२ नोव्हेंबरला रात्री ९ वाजल्यापासून दीपावली स्नेह मिलन सोहळा होणार आहे. (रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला वाहनांची धडक, वाघ गंभीर जखमी, वाचा सविस्तर)

चंद्रपूर बॉक्स क्रिकेट स्पर्धा वेळापत्रक

फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (एफटीसीआय), चंद्रपूर यांच्या वतीने क्रीडा, व्यापार आणि उत्सवाचा अनोखा संगम साधणारी तीन दिवसीय “ताडोबा अरण्यवास एफपीएल – सीझन १’ बॉक्स क्रिकेट स्पर्धा तसेच दीपावली स्नेह मिलन सोहळा २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ही स्पर्धा दाताला येथील ‘द बिग बुल क्लब टर्फ’ येथे आयोजित करण्यात आली आहे.

व्यावसायिकांमध्ये परस्पर संवाद, सहकार्य, नेटवर्किंग आणि स्नेहभाव अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, त्यानंतर ग्रुप लीग सामन्यांना सुरुवात होईल. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजीही सायंकाळी ६ वाजल्यापासून ग्रुप लीग सामने रंगणार आहेत. स्पर्धेच्या सांगता दिवशी म्हणजेच रविवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून लीग, उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जातील.

या तीन दिवसीय महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून दीपावली स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, जिल्हा संयोजक रामजीवन सिंह परमार, सचिव पंकज शर्मा यांच्यासह एफपीएल समितीचे मनीष पटेल, प्रवीण सारडा, प्रभाकर मंत्री, अमित नथवानी, सतीश व्यास आणि चेतन यादव विशेष परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेत आणि सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४० विविध व्यापारी संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात २० नोव्हेंबरपासून व्यापाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा; ४० संघटनांचा सहभाग”

Leave a Comment