नागभीड : नागभीड कार अपघातात नागभीड–तलोधी मार्गावरील चिंधिमाल फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता कार उलटून दोघांचा मृत्यू झाला. रामपूर (ता. वरोरा) येथील सुदर्शन नैताम यांचा घटनास्थळीच, तर खांबाडा (ता. वरोरा) येथील दिनेश धोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, या दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. (बस सेवा सुरु करा, भाजप विद्यार्थी आघाडीची मागणी, वाचा बातमी)
नागभीड–तलोधी मार्गावरील चिंधिमाल फाट्याजवळ पुलाच्या नजीक शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रामपूर (ता. वरोरा) येथील सुदर्शन नैताम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले दिनेश धोटे (रा. खांबाडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागभीड कार अपघात: दोघांचा मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, एमएच २४ एडब्ल्यू २९१० क्रमांकाच्या कारमधून सात जण तलोधी बालापूर येथून नागभीडकडे येत होते. दरम्यान, चिंधिमाल फाट्याजवळ पुलाच्या जवळ भरधाव कार अचानक रस्त्यावरून खाली घसरली. चालकाने कार पुन्हा डांबरी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळा पलटी खाल्ली.
या अपघातात सुदर्शन नैताम यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिनेश धोटे यांच्यासह आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. कारमध्ये बसलेल्या उर्वरित चौघांनाही दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच चिंधिमाल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना तात्काळ नागभीड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी दिनेश धोटे यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, कार चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची शंका प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. कार रस्त्यावरून खाली उतरल्यानंतर चालकाने ती पुन्हा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी वाहनावरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






