सिंदेवाही हातभट्टी दारू छाप्यात जप्त केलेले मोहफुल सडव्याचे ड्रम आणि दारूचे कॅन

१२ प्लास्टिक ड्रममध्ये ४८० लिटर सडवा; सिंदेवाही पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 21, 2026

सिंदेवाही: सिंदेवाही हातभट्टी दारू निर्मितीविरुद्ध पोलिसांनी पळसगाव येथील शेत शिवारातील नाल्याच्या काठावर छापा टाकून ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ७२० लिटर मोहफुल सडवा आणि ४० लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शरद सहारे (रा. पळसगाव जाट) याच्याविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (बँक खात्याचा सायबर फसवणुकीचा गैरवापर, गुन्हा दाखल))

अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी धडक कारवाई करत पळसगाव येथील शेत शिवारातील नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत ७२० लिटर मोहफुल सडवा, ४० लिटर गावठी मोहाची दारू आणि इतर साहित्य असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदेवाही हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा कसा टाकला?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २० नोव्हेंबर २०२६ रोजी सिंदेवाही पोलिसांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली होती की, मौजा पळसगाव येथील शेत शिवारातील नाल्याच्या काठावर शरद सहारे (रा. पळसगाव जाट, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) हा बेकायदेशीरपणे हातभट्टीची मोहफुल दारू गाळत आहे. या अचूक खबरेच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचून छापेमारी केली.

७२० लिटर मोहफुल सडवा आणि ४० लिटर दारू जप्त, सिंदेवाही हातभट्टी दारू

छाप्यादरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीचे साहित्य आणि तयार दारू आढळून आली. यामध्ये १२ निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये साठवलेला ४८० लिटर मोहफुल सडवा आणि काळ्या लोखंडी ड्रममधील २४० लिटर मोहफुल सडवा असा एकूण ७२० लिटर मोहफुल सडवा हस्तगत करण्यात आला. तसेच चार प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली ४० लिटर मोहाची हातभट्टी दारू आणि गाळण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण ५० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी आरोपी शरद सहारे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व (फ) अन्वये सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. (सिंदेवाही हातभट्टी दारू)

सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांच्यासह पोलीस हवालदार संजय जुगनाके तसेच अंमलदार शुभम उराडे, नंदकिशोर तुमराम, निलेश कोकुलवार आणि गंगाधर शहारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment