वरोरा जीवघेणा हल्ला प्रकरणाचे प्रातिनिधिक पोलिस दृश्य

चल गणपती बघायला जाऊ, नकार दिल्यावर घडलं भयावह

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 29, 2026

वरोरा (चंद्रपूर): वरोरा जीवघेणा हल्ला प्रकरणाने कॉलरी वॉर्ड परिसरात खळबळ उडाली आहे. गणपती पाहण्यासाठी सोबत येण्याच्या कारणावरून हा वाद झाला. दारूच्या नशेत आलेल्या अमित अशोक मेश्राम याने मित्र शरद शेख आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले. शरद यांच्या बहिणीला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (मांगूर मासे, पोलिसांनी मागितले ७० हजार, वाचा हि बातमी)

गणपती पाहण्यास जाण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका दारूच्या नशेतील तरुणाने आपल्याच मित्रावर आणि त्याच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वरोरा येथील कॉलरी वॉर्ड भागात घडली आहे. या घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरोरा जीवघेणा हल्ला नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलरी वॉर्ड येथील रहिवासी शरद मुश्ताक शेख (वय ३०) हे शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी त्यांचा शेजारी आणि मित्र अमित अशोक मेश्राम हा दारूच्या नशेत धुंद होऊन त्यांच्या घरी आला. अमितने घराचा दरवाजा ठोठावत शरद यांना गणपती पाहण्यासाठी सोबत येण्याचा तगादा लावला. मात्र, उशीर झाल्याने आणि अमित नशेत असल्याने शरद यांनी जाण्यास नकार दिला.

शरद आणि त्यांच्या पत्नीने अमितला समजावून घरी जाण्यास सांगितले, परंतु तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. वाद वाढत असल्याचे पाहून शरद यांची आई शाहनाज शेख (वय ५०) आणि बहीण तरन्नुम शेख (वय ३५) या पहिल्या मजल्यावरून खाली आल्या आणि त्यांनीही अमितला समजावण्याचा प्रयत्न केला.

गणपती पाहण्यावरून वादाची सुरुवात

या समजावण्याचा अमितला भयंकर राग आला. रागाच्या भरात त्याने शरद यांची बहीण तरन्नुम तिला जोराने धक्का दिला, ज्यामुळे ती पहिल्या मजल्यावरून थेट रस्त्यावर डोक्याच्या भारावर खाली कोसळली. या भीषण घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर संतापलेल्या अमितने शरद यांची आई शाहनाज यांनाही धक्का देऊन पायऱ्यांवर ढकलून दिले. शरद यांनी अमितला रोखण्याचा प्रयत्न केला असता, अमितने त्यांनाही जिन्याच्या पायऱ्यांवरून ढकलून दिले, ज्यामुळे शरद बेशुद्ध झाले.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या तरन्नुम आणि शाहनाज यांना स्थानिकांनी तत्काळ वरोरा येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, तरन्नुम यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर आणि तेथून पुढे नागपूर येथील एम्स व मेडीकल कॉलेज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. या घटनेत शरद यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले असून त्यांच्यावरही उपचार करण्यात आले आहेत.

उपचार घेतल्यानंतर शरद शेख यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून आरोपी अमित अशोक मेश्राम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११७(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment