चंद्रपूर जिल्ह्यातील मांगूर मासा प्रकरणाशी संबंधित प्रतिकात्मक छायाचित्र

त्या डीबी पथकाला प्रतिबंधित मांगूर मासा पावला का?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 6, 2026

चंद्रपूर – मांगूर मासा प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रतिबंधित मांगूर माशाचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांच्या डीबी पथकाने ७० हजार रुपये मागितल्याचा आरोप होत आहे. माहितीनुसार, आधी ४० हजार रुपये घेतले गेले आणि उर्वरित ३० हजार नंतर घेतल्याचे सांगितले जाते. पैसे घेतानाचा व्हिडीओ काढण्यात आल्याचा दावा आहे. हे प्रकरण नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनशी संबंधित आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. संदीप, सोनू आणि संदीप ही नावे चर्चेत आहेत. News34 कडून पडताळणी सुरू आहे आणि पुढील माहिती मिळताच अपडेट दिले जाईल.

मागील काही दिवसापासून डीबी पथकाच्या मांगूर मासा तोंडी प्रकरण चांगलेच गाजत आहे, मात्र ते प्रकरण कुठले व कोणत्या पोलीस स्टेशनशी संबंधित आहे यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. सदर प्रकरण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे अशी माहिती पुढे आली आहे. मात्र पोलीस स्टेशन कोणते हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. पण या प्रकरणी संदीप, सोनू व संदीप अशी नावे मात्र समोर आली आहे. (मजुरीचे पैसे मागितले आणि हल्ला. वाचा हि बातमी)

प्रतिबंधित मांगूर मासा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पोलिसांच्या डीबी पथकाने ७० हजार रुपये मागितले, मात्र पैसे घेताना त्यांचा व्हिडीओ काढण्यात आला. आधी ४० हजार घेतले असून ३० हजार रुपये नंतर घेतल्याची माहितीही समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला प्रथमच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी शिस्तबद्ध पोलीस अधीक्षक लाभले आहे. मात्र प्रामाणिक पोलीस अधीक्षक यांच्या कार्यकाळात काही पोलीस मांगूर मासे व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करीत आहे.

मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या मांगूर मास्यामुळे कर्करोग व मधुमेह होतो, अस्वच्छ वातावरणात वाढलेला हा मासा अत्यन्त धोकादायक आहे त्यामुळे शासनाने या मास्यावर बंदी घातली आहे, मात्र या धोकादायक मास्याचा व्यापार करण्यासाठी संदीप, सोनू व संदीप यांनी व्यापाऱ्याला अभय दिले असल्याची माहिती आहे. काही पैश्यासाठी मानवी जीवनाच्या आरोग्याशी हे तीन कर्मचारी खेळत आहे. सध्या तरी या संदर्भात माहिती मिळवणे सुरु आहे, येणाऱ्या काही दिवसात आम्ही या प्रकरणाचा उलगडा करू आणि त्या पोलिसांचे नाव वरिष्ठांना पूर्ण पुराव्यानिशी देत हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment