डीबी पथक तोडी प्रकरणाशी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रतीकात्मक छायाचित्र

मांगूर मासा; त्या डीबी पथकाचे “नसीब’ खराब

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 2, 2026

क्राईम – डीबी पथक तोडी प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे. प्रतिबंधित मांगूर माशांचा व्यवसाय करणाऱ्याकडे डीबी पथकाने ७० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबतचे वृत्त NEWS34 ने आधी प्रकाशित केले होते. (डीबी पथकाने मागितले ७० हजार, वाचा हि बातमी)

जिल्ह्यातील एका पोईस ठाण्याच्या डीबी पथकाने ७० हजाराची तोडी केल्याचे वृत्त आम्ही प्रकाशीत केले होते, आता सदर प्रकरणातील तोडी बहाद्दरांची नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिबंधित मांगूर माश्यांचा व्यवसाय करणाऱ्या वर या डीबी पथकाने कारवाई केली. मात्र ती कारवाई अधिकृत नव्हती, डीबी पथकाचा उद्देश्य केवळ तोडी करण्याचा होता, यासाठी ७० हजार रुपये मागितले होते.

डीबी पथक तोडी प्रकरण: मांगूर व्यावसायिकावर कथित कारवाई

मांगूर मासे प्रतिबंधित आहे, मात्र त्यानंतरही पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाईच्या नावावर काय द्यायचं व किती घ्यायचं हा मनात विचार करून त्या मांगूर व्यवसाय करणाऱ्याकडे अनधिकृत पद्धतीने धाड मारली. त्याला कायद्याचा धाक दाखविण्यात आला, आता कारवाई होणार या भीतीने व्यावसायिक घाबरला काही तडजोड होणार का? अशी मनात भावना ठेवत तो त्या डीबी पथकातील पोलिसांकडे बघू लागला. ठीक आहे कारवाई करणार नाही मात्र त्यासाठी ७० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी पोलिसांनी केली.

मांगूर व्यावसायिकाने पैसे देण्याची समर्थता दाखवली, पैसे देण्याचा दिवस जवळ आला, डीबी पथकातील दोन कर्मचाऱ्यांसोबत नसीब पंच म्हणून सोबतीला आला, ४० हजार रुपये देताना मांगूर व्यावसायिकाने व्हिडीओ काढला, ४० हजार भेटल्यावर त्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता वाट होती ३० हजाराची, मात्र तत्पूर्वी आपला पैसे घेताना व्हिडीओ तयार झाला अशी माहिती डीबी पथकाला मिळाली. नसीब घाबरला आता काय करायचे काही सुचेनासे झाले.

डीबी पथकाने शांत डोकं ठेवत एक योजना आखली, मांगूर व्यावसायिकाला पोलीस ठाण्यात बोलाविले, त्याचा मोबाईल घेत व्हिडीओ डिलीट केला, त्यानंतर उर्वरित रकमेची मागणी केली. पण मोठा प्रश्न आहे कि तो व्हिडीओ खरच डिलीट झाला का? तर याच उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळेलंच.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment