चंद्रपूर कुंटणखाना प्रकरणी अष्टभुजा वॉर्डात कारवाई करणारे एलसीबी पथक

चंद्रपुरात वेश्याव्यवसाय, LCB ची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 2, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर कुंटणखाना प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरुवारी, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठी कारवाई केली. अष्टभुजा वॉर्डात लव्ह इंडिया चर्चच्या मागे एका राहत्या घरात हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून दोन महिला दलालांना अटक केली. दोन पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. (त्या डीबी पथकाचे नसीब खराब, ७० हजाराची तोडी, वाचा हि बातमी)

चंद्रपूर कुंटणखाना: गुप्त माहितीवरून एलसीबीची कारवाई

अष्टभुजा वॉर्डातील एका घरात महिलांकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती १ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत विशेष पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने लागलीच हालचाली सुरू केल्या. खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी प्रथम एक बनावट गिऱ्हाईक पाठवून छुप्या पद्धतीने पडताळणी केली. प्रकार उघडकीस येताच महिला पंच, सोशल वर्कर आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला.

दोन महिला दलालांवर गुन्हा, २२,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाई दरम्यान मुस्कान शफीक शेख (वय ४० वर्षे, रा. रॉयनगर, लव्ह इंडिया चर्चजवळ, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर; मूळ रा. उसगाव, ता. घुग्गुस) आणि रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (वय ४५ वर्षे, रा. टॉवर टेकडी, जुनोना चौक, अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) या दोन्ही महिला आरोपी आपसात संगनमत करून पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा एकूण २२,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही महिला दलालांना अटक करण्यात आली आहे. घटनेतील पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली असून रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकार, पोलीस अंमलदार किशोर वैरागडे, प्रफुल्ल गारघाटे, शशांक बदामवार, प्रदीप मडावी, ऋषभ भारसिंगे, महिला अंमलदार छाया निकोडे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, अपर्णा मानकर, उषा लेंडांगे, गीता उमरे, दीपिका सोडणार, सीमा निषाद तसेच सोशल वर्कर सरिता मालू, माया मेश्राम, रूपाली तोंडरे आणि विद्या चिताडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment