Ballarpur News Crime Police Investigation Concept

पत्नीने भजे बनवून दिले नाही; पती संतापला आणि केलं भयावह कृत्य

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 18, 2026

बल्लारपूर (चंद्रपूर): Ballarpur News Crime अंतर्गत इटोली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. भजे बनवून दिले नाही या कारणावरून हा वाद पेटला होता.

चंद्रकला भूरसे असे ६० वर्षीय जखमी वृद्ध महिला पती रामदाससोबत राहतात. पतीला नेहमी दारू पिण्याचे व्यसन आहे. ते रोज घरात वाद घालत असत.

घरगुती वादातून आणि दारूच्या नशेत पतीने स्वतःच्या वृद्ध पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली गावात परिसरात उघडकीस आली आहे. घरात जेवण तयार असतानाही तात्काळ भजे बनवून देण्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद पेटला. या प्रकरणी बल्लारशा पोलीस ठाण्यात आरोपी पनाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – जादूटोण्याचा संशय, कुटुंबावर जीवघेणा हल्ला)

मिळालेल्या माहितीनुसार, इटोली येथील रहिवासी तक्रारदार ६० वर्षीय चंद्रकला रामदास भूरसे या आपले ७० वर्षीय पती रामदास लक्ष्मण भूरसे यांच्यासोबत राहतात. त्यांचा मुलगा दिलीप भूरसे हा कुटुंबासह शेजारीच राहतो. चंद्रकला भूरसे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती रामदास भूरसे यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. ते नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन विनाकारण भांडण उकरून काढत शिवीगाळ व मारहाण करत असत.

भजे न बनवल्याने दारूच्या नशेत पेटला वाद

सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.०० वाजेच्या सुमारास तक्रारदार चंद्रकला यांनी घरातील स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि त्या विश्रांती घेत होत्या. याच वेळी पती रामदास हे बाहेरून दारू पिऊन घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीकडे लागलीच भजे बनवून देण्याची मागणी केली. त्यावर चंद्रकला यांनी “घरात स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही जेवण करून घ्या,” असे सांगितले. या साध्या उत्तराने संतापलेल्या रामदास यांनी “तू आत्ताच्या आत्ता मला भजे बनवून दिले नाहीस, तर घरातून निघून जा” असे म्हणत पत्नीशी जोरदार भांडण सुरू केले आणि अश्लील शिवीगाळ करू लागले.

पत्नीने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, आरोपी रामदास हे अचानक त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता रामदास यांनी घरात ठेवलेली कुऱ्हाड मारण्यासाठी उचलली. पती कुऱ्हाड मारणार असल्याचे दिसताच चंद्रकला यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी ती कुऱ्हाड पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कुऱ्हाडीचे धारदार पाते चंद्रकला यांच्या डाव्या हाताला लागून त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला.

घराच्या अंगणात बसलेला मुलगा दिलीप भूरसे याने आईचा आक्रोश ऐकून तातडीने घरात धाव घेतली. त्याने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी रामदास भूरसे यांनी त्यालाही धक्काबुक्की केली. तसेच “तुम्ही मला परत काही बोललात तर तुम्हा दोघांना मारल्याशिवाय राहणार नाही,” अशी धमकी दिली.

या घटनेनंतर भीतीपोटी आणि पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून चंद्रकला भूरसे यांनी बल्लारपूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या तोंडी निवेदनावरून बल्लारपूर पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी पहाटे ००:५७ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार करत असून, पोलीस निरीक्षक बिपीन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश बाबुराव वाघमारे हे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment