nagbhid crime news nagbhid police investigation

अंधश्रद्धेतून अख्ख्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; नागभीड हादरले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 18, 2026

नागभीड (जि. चंद्रपूर): nagbhid crime news अंतर्गत नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिजा पांढरणी गावात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चार निष्पाप सदस्यांना काठ्या, विटा आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी नागभीड पोलिसांनी गावातीलच आरोपींसह एकूण सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – वरोऱ्यात हत्येचा कट उधळला, पिस्टल व जिवंत काडतुससह एकाला अटक)

जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चार जणांना काठ्या, विटा आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिजा पांढरणी येथे घडली आहे. या घटनेत पीडित कुटुंबातील सदस्यांना गंभीर दुखापत झाली असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी ५६ वर्षीय महिला सुमित्रा सुकाजी सेलोकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी गावातीलच आरोपींसह एकूण सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जादूटोण्याचा थेट आरोप करत विटा आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिजा पांढरणी येथील रहिवासी सुमित्रा सेलोकर या आपले पती सुकाजी, मुलगा किशोर आणि सून सुनिता यांच्यासह घरात असताना ही घटना घडली. आरोपी रवींद्र सियाराम भाजीपाले, पवन रवींद्र भाजीपाले, पवनची पत्नी, तिची आई आणि इतर तीन अनोळखी इसम अशा एकूण सात जणांनी हातात काठ्या घेऊन सेलोकर यांच्या अंगणात अनाधिकृतपणे प्रवेश केला. ‘तुम्ही माझ्या पत्नीवर आणि सुनेवर जादूटोणा केला, त्यामुळे त्यांची तब्येत खराब राहते आणि सुनेने विष प्राशन केले,’ असा थेट आरोप करत आरोपींनी सेलोकर कुटुंबाला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

संभाषण वाढल्यानंतर आरोपींनी हातात असलेल्या काठ्यांनी सुमित्रा सेलोकर आणि त्यांचे पती सुकाजी यांच्या डोक्यावर व खांद्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, सून सुनिता ही मध्यस्थी करून भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. तर मुलगा किशोर याच्या कपाळावर आरोपी पवन याने विटेने प्रहार केला आणि इतर साथीदारांनी त्याला धरून ठेवून मारहाण केली. भीतीपोटी पीडित कुटुंब घरात पळून गेले असता, आरोपी रवींद्र भाजीपाले याने घरात घुसून सुमित्रा सेलोकर यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर किशोर सेलोकर याने तात्काळ १०८/११२ या पोलीस आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे वाहन येताना पाहून सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी सर्व जखमींना उपचारासाठी दाखल केले असून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा बंदी व निर्मूलन अधिनियम २०१३ चे कलम ३(२) सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), २९६, ३३३ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment