Nagbhid Crime News police register FIR against three accused in assault case

प्रेमसंबंधाच्या संशयावरून सिनेस्टाइल पाठलाग, रॉड ने हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 19, 2026

नागभीड (चंद्रपूर): Nagbhid Crime News समोर आली असून संशयातून एका चालकाचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याच्यावर स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. नवेगाव मिंथुर टी-पॉईंट परिसरात ही धक्कादायक घटना घडली. हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीला जबर मार लागला आहे. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी तत्परता दाखवत तीन संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – भजे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला)

चारित्र्यावर संशय घेऊन एका चालकाचा दुचाकीने पाठलाग करत त्याच्यावर चालत्या वाहनावरच स्टीलच्या रॉडने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पारडी ठवरे (ता. नागभीड) येथील रहिवासी रुपेश लहुजी राउत (वय ४०) हे आपल्या चारचाकी वाहनाने गावातील महिलांना भिवापूर येथे मजुरीसाठी ने-आण करण्याचे काम करतात. त्यांच्या वाहनातून गावातीलच एक महिला मजुरीच्या कामासाठी जात असल्याने, तिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय महिलेच्या नातेवाईकांना होता. या संशयातूनच संशयित आरोपी नितेश झरकर (रा. पारडी ठवरे) आणि क्रिष्णा काशीनाथ येले (रा. सरांडी, ता. भिवापूर) हे तक्रारदाराच्या मागे लागून होते.

चालत्या दुचाकीवर स्टील रॉडने जीवघेणा हल्ला

दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तेजस रावसाहेब मंदिरकर (रा. कानवा, ता. उमरेड) याने तक्रारदारास फोन करून अश्लील शिवीगाळ करत चिकमारा फाट्यावर भेटायला येण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच रात्री नऊ वाजेच्या सुमारास तक्रारदार हे आपल्या दुचाकीने नवेगाव येथून गावाकडे जात असताना, नवेगाव मिंथुर टी-पॉईंटवर आधीच दबा धरून बसलेल्या नितेश झरकर, क्रिष्णा येले आणि तेजस मंदिरकर यांनी त्यांची वाट अडवली. धोका ओळखून तक्रारदाराने तेथून गाडी पळवून काढण्याचा प्रयत्न केला असता, तिन्ही आरोपींनी पल्सर दुचाकीवरून त्यांचा वेगाने पाठलाग सुरू केला.

हा पाठलाग सुरू असतानाच चालत्या गाडीवर तेजस मंदिरकर याने हातातील स्टीलच्या रॉडने तक्रारदाराच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने तातडीने नागभीड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.

फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे नागभीड पोलिसांनी आरोपी तेजस रावसाहेब मंदिरकर, नितेश झरकर आणि क्रिष्णा काशीनाथ येले या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२६(२), २९६, ११८(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment