Chandrapur Road Potholes inspection by municipal commissioner for ganeshotsav

चंद्रपूरकरांनो रस्त्यात खड्डा दिसला तर ‘इथे’ कॉल करा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 19, 2026

चंद्रपूर – Chandrapur Road Potholes समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानंतर मनपा आयुक्तांनी मिरवणूक आणि विसर्जन मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविक व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे सर्व मार्ग तात्काळ दुरुस्त करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी पालिकेने अधिकृत टोल-फ्री क्रमांकही सुरू केला आहे. (हे हि वाचा – वेकोलि मध्ये जमीन गेल्यांस मिळणार एकरी ३० लाख रुपये)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आढावा घेतला आहे. त्यानुसार दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या मिरवणुकीचे मार्ग तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांची संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत पाहणी केली.

सदर पाहणीदरम्यान रस्त्यांवर आढळून आलेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच मिरवणूक मार्ग सुरक्षित व सुस्थितीत राहावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच, नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत टोल-फ्री क्रमांक 1800 309 7040 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे किंवा तत्सम समस्या निदर्शनास आल्यास 1800 309 7040 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींचे संबंधित विभागामार्फत तातडीने निवारण करण्यात येईल.

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment