Chandrapur Ganesh Visarjan साठी रामसेतू पुलाखाली तयार केलेला कृत्रिम तलाव

चंद्रपुरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव; मनपाची तयारी पूर्ण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 25, 2026

चंद्रपूर : Chandrapur Ganesh Visarjan साठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था केली आहे. रामसेतू पुलाखाली हा तलाव तयार करण्यात आला आहे. नदीपात्रातील थेट विसर्जन टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मोठ्या गणेशमूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक आणि विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. गणेश विसर्जन काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पोहोचल्या जिवती तालुक्यात, दौरा कशाचा? वाचा हि बातमी)

Chandrapur Ganesh Visarjan साठी कृत्रिम तलाव सज्ज

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रामसेतू पुलाखाली कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असून, नदीपात्रातील थेट विसर्जन टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे.

या विसर्जनस्थळाची पाहणी महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, उपयुक्त संदीप चिद्रावार यांनी केली. तसेच मुख्य अभियंता रवींद्र हजारे, स्वच्छता अधिकारी डॉक्टर अमोल शेळके, रवींद्र कळंबे, चैतन्य चोरे, प्रगती भुरे, सोनू थूल, अहमद सिद्दीक इ. उपस्थित मनपा अधिकारी यांनी यावेळी विसर्जनस्थळी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया, प्रकाशयोजना तसेच आवश्यक मनुष्यबळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून, क्रेनच्या सहाय्याने मूर्ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करण्यात येणार आहेत. विसर्जन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता, विसर्जनस्थळी सुरक्षितता व शिस्त राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना विसर्जनाच्या वेळी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला बळ देत, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रदूषणमुक्त गणेश विसर्जनासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment