Pressure DJ Sindewahi प्रकरणातील पोलिसांची कारवाई

डीजे चा धिंगाणा; सिंदेवाहीत डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकारणीवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 25, 2026

सिंदेवाही (चंद्रपूर): Pressure DJ Sindewahi प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कारवाई केली आहे. मौजा पवनपार येथे तीव्र आवाजाचा प्रेशर मिड्स डीजे वापरल्याचा आरोप आहे. शासनाचे ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम आणि पोलिस प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणात डीजे मालक आणि नवयुवक बाल गणेश मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी साऊंड सिस्टिम, प्रेशर मिड्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि वाहने जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख ३५ हजार रुपये आहे. (रेल्वे स्थानकावर अचानक धडकले गुन्हे शाखेचे पथक, काय झाली कारवाई वाचा हि बातमी)

Pressure DJ Sindewahi प्रकरणात पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील मौजा पवनपार येथे नवयुवक बाल गणेश मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शासनाने पूर्णपणे बंदी घातलेल्या तीव्र आवाजाच्या प्रेशर मिड्स डीजेचा सर्रास वापर केला जात होता. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे तसेच पोलीस प्रशासनाच्या आदेशांचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष जप्ती पंचनामाची कारवाई पूर्ण करून डीजे मालक आणि नवयुवक बाल गणेश मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांवर सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डीजे मालक आणि गणेश मंडळाच्या कार्यकारिणीवर गुन्हा

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३८(१), १३६ आणि ७० अन्वये अपराध क्रमांक ५७०/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान साऊंड सिस्टिम, प्रेशर मिड्स, डीजेचे इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि ते वाहून नेणारी वाहने असा एकूण १५,३५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सणासुदीच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे डीजे चालकांमध्ये आणि मंडळ कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कांचन पांंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश पेंडेर, सुनिल बहेकार आणि नंदकिशोर तुमराम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment