Chandrapur MPDA Action अंतर्गत वरोरा पोलिसांच्या कारवाईचे प्रातिनिधिक चित्र

१८ गुन्हे दाखल असलेल्या वरोऱ्यातील आरोपीवर एमपीडीए

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 25, 2026

चंद्रपूर: Chandrapur MPDA Action अंतर्गत वरोरा येथील देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी हे आदेश पारित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात खून, अवैध दारू विक्री, आर्म्स ॲक्ट आणि जुगार कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानबद्धतेचा हा निर्णय प्रतिबंधात्मक स्वरूपाचा असून त्यासाठी पोलिसांनी सादर केलेल्या तथ्यांची दखल घेण्यात आली. (शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली दीड कोटीची फसवणूक, वाचा हि फसवणुकीची बातमी)

Chandrapur MPDA Action: नेमकी कारवाई काय आहे?

वरोरा येथील रहिवासी असलेला कुख्यात गुंड देवा नौकरकर याच्याविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात खून, अवैध दारू विक्री, शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) आणि महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे वरोरा आणि परिसर मधील सामान्य जनतेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. यापूर्वी पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी विविध प्रतिबंधक कारवाया केल्या होत्या; परंतु कायद्याचा कोणताही धाक न बाळगता त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

वरोरा पोलीस ठाण्यात १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती

त्याच्या या वाढत्या दहशतीची आणि गुन्हेगारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी देवा नौकरकर याच्याविरोधात एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत (सुधारणा २००९, २०१५) स्थानबद्धतेचा कडक प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत (भा.प्र.से.) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावातील सर्व तथ्ये, दाखल गुन्हे आणि स्थानिक परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी देवा उर्फ देविदास भैयाजी नौकरकर याला या कायद्यांतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे अंतिम आदेश पारित केले आहेत.

गणेशोत्सवाच्या मुखावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी पार पाडली आहे. भविष्यातही जिल्ह्यातील शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या समाजकंटकांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment