Ballarpur Railway Station वर श्वान पथकासह पोलिसांनी केलेली तपासणी

बल्लारपूर रेल्वे स्थानकात अमली पदार्थविरोधी धडक मोहीम; आंध्र प्रदेश एक्सप्रेसची तपासणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 23, 2026

चंद्रपूर: Ballarpur Railway Station येथे बुधवारी, २३ सप्टेंबर २०२६ रोजी अमली पदार्थ तस्करीविरोधात संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा, बल्लारपूर पोलीस, शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी यात सहभाग घेतला.

सकाळी १०:३० ते ११:३० दरम्यान आंध्र प्रदेश एक्सप्रेसची (२०८०५) कसून तपासणी झाली. स्लीपर आणि जनरल कोचमधील प्रवाशांच्या साहित्याची बारकाईने पाहणी करण्यात आली. श्वान पथकातील ‘अर्जुन’ आणि ‘मंगल’ यांनी बॅगा व सामानाची पाहणी केली. या तपासणीत कोणताही अमली पदार्थ किंवा संशयास्पद साहित्य आढळले नाही. (२५ सप्टेंबरला चंद्रपुरातील मार्ग बंद, वाचा हि बातमी)

Ballarpur Railway Station वर संयुक्त शोध मोहीम

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० वाजेच्या सुमारास ही व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक, पोलीस स्टेशन बल्लारपूरचे गुन्हे प्रकटीकरण पथक, चंद्रपूर जिल्हा पोलीस श्वान पथक तसेच जीआरपी आणि आरपीएफ बल्लारपूरच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. या शोध मोहिमेदरम्यान बल्लारपूर स्थानकावर आलेल्या आंध्र प्रदेश एक्सप्रेस (गाडी क्रमांक २०८०५) ची सखोल तपासणी करण्यात आली. पथकाने ट्रेनमधील स्लीपर तसेच जनरल कोचमध्ये जाऊन प्रवाशांच्या साहित्याची बारकाईने पाहणी केली.

श्वान पथकातील ‘अर्जुन’ आणि ‘मंगल’ची भूमिका

या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले ते चंद्रपूर जिल्हा पोलीस श्वान पथकातील ‘अर्जुन’ आणि ‘मंगल’ हे प्रशिक्षित श्वान. या दोन्ही श्वानांच्या मदतीने संशयित बॅगा, डबे आणि संपूर्ण प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या अचानक झालेल्या तपासणीमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सुमारे तासभर चाललेल्या या तीव्र शोध मोहिमेदरम्यान सुदैवाने कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ किंवा संशयास्पद साहित्य मिळून आले नाही, ज्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

अमली पदार्थांच्या छुप्या मार्गाने होणाऱ्या तस्करीला वेसण घालण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या संयुक्त तपासणी मोहिमा नियमितपणे राबवून अमली पदार्थ तस्करांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि रेल्वेमार्गे होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी चंद्रपूर पोलीस व रेल्वे पोलीस यापुढेही सतर्क राहून संयुक्तपणे अशीच धडक कारवाई सुरु ठेवणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment