चंद्रपूर फटाके बंदी : सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील निर्बंधाची प्रतिकात्मक प्रतिमा

चंद्रपूर फटाके बंदी: सार्वजनिक रस्ते व चौकांत फटाके फोडण्यास मनाई; मनपाची मोठी चूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 7, 2026

चंद्रपूर – : चंद्रपूर फटाके बंदी लागू करणारी सार्वजनिक सूचना चंद्रपूर शहर महानगरपालिकेने जारी केली आहे. वाढते वायू आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सूचनेनुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथ आणि चौकांत फटाके फोडण्यास मनाई आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध राहतील. ध्वनिक्षेपकासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक आहे. उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करून कारवाई होईल, असे मनपाने म्हटले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात बाल संरक्षण समित्या स्थापन होणार – जिल्हाधिकारी पंत)

चंद्रपूर फटाके बंदी: मनपाच्या सूचनेत काय आहे?

चंद्रपूर शहरातील वाढते वायू व ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. फटाक्यांचा अनियंत्रित वापर, ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.
या सूचनेनुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथ व चौकांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील घोषित शांतता क्षेत्रात १०० मीटरच्या परिघात ध्वनिक्षेपक व फटाक्यांच्या वापरावर निर्बंध राहणार आहेत.

ध्वनिक्षेपकासाठी लेखी परवानगी बंधनकारक, चंद्रपूर फटाके बंदी

ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टिमचा वापर करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरणे तसेच निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित साहित्य जप्त करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात ६५ व ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ व ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ५० व ४० डेसिबल अशी ध्वनीमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

तक्रार कुठे आणि कशी करावी?, चंद्रपूर फटाके बंदी

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेने नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार यांची नियुक्ती केली आहे. तक्रार निवारण कक्ष अग्निशमन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका येथे कार्यरत असून नागरिकांनी आपल्या परिसरातील ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी नोंदवाव्यात, निवारण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक १०१,०७१७२ २५४६१४, ९८२३०१७१०१  १८००५३२१५७५ हा आहे. तसेच प्रभागनिहाय ई-मेल आयडी
Zone-1 : cmczoneno1@gmail.com, Zone-2: cmczoneno2@gmail.com, Zone-3: cmczoneno3@gmail.com असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनीप्रदूषणमुक्त आणि स्वच्छ चंद्रपूर शहरासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मनपाच्या प्रसिद्धीपत्रकात अग्निशमन विभागाचा संपर्क क्रमांक? चंद्रपूर फटाके बंदी

विशेष बाब म्हणजे चंद्रपूर मनपाने तक्रार करण्यासाठी अग्निशमन विभागाचा क्रमांक टाकला असून सदर क्रमांकावर सुजाण नागरिक पत्रकार सुनील तिवारी यांनी संपर्क साधत मनपाच्या आदेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले कि आमचा संपर्क क्रमांक प्रसिद्धीपत्रकात दिला हे आम्हाला ठाऊक नाही, आमचं काम हे आगीची घटना कुठे घडली तर त्याठिकाणी जाणे हे आमचं काम आहे, आमचा संपर्क क्रमांक का दिला याबाबत आम्हाला कल्पना नाही, यावर तिवारी यांनी तुम्हाला न विचारता पालिका तुमचा क्रमांक कशाला देणार असा प्रश्न विचारताच त्यावर पुढून काही उत्तर आलं नाही. सध्या चंद्रपूर मनपाचा कारभार हा अंधेर नगरी चौपट राजा सारखा झाला आहे. कोण कोणत्या कामाला बांधील आहे याबाबत कुणाला काही कल्पना नाही. मनपाच्या या उलट कारभारावर तिवारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment