चंद्रपूर बाल संरक्षण समित्या आणि बालकामगारविरोधी मोहीम

प्रत्येक गावात बाल संरक्षण समित्या स्थापन होणार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 7, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर बाल संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरी भागातील प्रत्येक वॉर्डात बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबविण्यासह बालविवाह आणि बालकांच्या शोषणाला आळा घालण्यावर भर देण्यात आला आहे. संकटात सापडलेल्या बालकांना मदत मिळण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चा प्रचार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (बार बांधकामाची परवानगीसाठी मागितली ३ लाखाची लाच, वाचा बातमी)

चंद्रपूर बाल संरक्षणासाठी प्रत्येक गावात समित्या स्थापन होणार

जिल्ह्यातील बालकांचे हक्क व संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी, तसेच बालकांवरील अत्याचार, बालविवाह, बालमजुरी व बालकांच्या शोषणास अटकाव करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरी भागातील प्रत्येक वॉर्डात बाल संरक्षण समित्या स्थापन करून त्यांचा अहवाल तातडीने सादर करावा, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली; त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीदरम्यान त्यांनी बाल संरक्षणाशी संबंधित विविध योजनांचा आणि प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला.

बालकामगारांविरोधात धाडसत्र मोहीम राबविणार, चंद्रपूर बाल संरक्षण

बैठकीत भूमिका मांडताना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, बालकांचे संरक्षण, संगोपन आणि पुनर्वसन या बाबींना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत. यासोबतच बालगृहांमध्ये दाखल असलेल्या बालकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान करून पात्र बालकांचे नियमानुसार लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे; यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाने संबंधित सर्व यंत्रणांशी योग्य समन्वय साधून जलद गतीने कार्यवाही करावी. जिल्ह्यात बालकामगार आढळून येणाऱ्या सर्व संभाव्य ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात यावी आणि बालमजुरीला पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून काम करावे.

चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चा गावागावांत प्रचार, चंद्रपूर बाल संरक्षण

संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या आपत्कालीन क्रमांकाची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि वॉर्डात व्यापक पातळीवर पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाकडे प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे नियमानुसार तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा, चंद्रपूर बाल संरक्षण

या बैठकीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादरीकरणाद्वारे मांडला. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. क्षमा बासरकर, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, परिविक्षा अधिकारी अतिश चव्हाण व सायली पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, मनोविकृती तज्ज्ञ संदीप भटकर आणि चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाचे सदस्य आणि विविध विभागांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment