चंद्रपूर – चंद्रपूर पाणीटंचाई बैठक नियोजन भवन येथे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील पाणीसाठा, पाणीपुरवठा आणि भविष्यातील नियोजनावर यात चर्चा झाली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोल वॉशरीजचा पाणीपुरवठा तात्पुरता १०० टक्के खंडित करावा. माना खुल्या खदानीतील पाणी औद्योगिक वापरासाठी घेण्याचा पर्यायही त्यांनी सुचवला. त्यांनी पालकमंत्र्यांना लेखी निवेदनही सादर केले. (चंद्रपूर घुग्गुस मार्गावर भीषण अपघात, ३ ठार)
चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पाणीसाठा, पाणीपुरवठा आणि भविष्यातील पाणी नियोजनावर चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर पाणीटंचाई बैठक: पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काय चर्चा झाली?
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी करत अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या. जिल्ह्यातील सर्व कोल वॉशरीजचा पाणीपुरवठा १०० टक्के खंडित करून पाण्याची स्थिती सुधारेपर्यंत हे कारखाने तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली. इतर उद्योगांना ३० टक्के पाणी कपातीच्या सूचना दिल्या जात असताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरणार्या कोल वॉशरीजवरही कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पालकमंर्त्यांना लेखी निवेदनही सादर केले.
माना खदानीचे पाणी पर्यायी स्रोत म्हणून; चंद्रपूर पाणीटंचाई बैठक
चंद्रपूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी वेकोलिच्या माना खुल्या खदानीतील पाण्याचा पर्यायी स्रोत म्हणून वापर करण्याची अभिनव सूचना मांडली. माना खदानीतील पाणी सीएसटीपीएसने औद्योगिक वापरासाठी उचलावे आणि त्याबदल्यात इरई धरणातील तेवढेच पाणी चंद्रपूर महानगरपालिकेला शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा, सीएसटीपीएस आणि वेकोलि प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सामंजस्य करार करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
नदी संगमस्थळांच्या विकासाची मागणी, चंद्रपूर पाणीटंचाई बैठक
सोबतच आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील इरई-वर्धा, इरई-झरपट आणि वर्धा-पैनगंगा या नद्यांच्या संगमस्थळांचा विकास करण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. या ठिकाणी भाविकांसाठी सुरक्षित स्नान व्यवस्था, पक्के घाट, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात. तसेच या विकासकामांचा समावेश आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे प्रभावी नियोजन, पर्यायी जलस्रोतांचा वापर आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चंद्रपूर शहराला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत मांडली. येथील नदींवर बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







