चंद्रपूर – Chandrapur Ganesh Visarjan Bandobast: चंद्रपूर शहरात आज अनंतचतुर्दशीला श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यापूर्वी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गणेश विसर्जन दरम्यान कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात हजारावर पोलीस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांनी गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत पायदळ मार्च करीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. महिला पोलीस दल व अत्याधुनिक AI व्हॅन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असून, नियम मोडणाऱ्या डीजे चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (लायसन्स साठी बाहेर निघाले, अज्ञात वाहनाने चिरडले, दोघांचा मृत्यू, वाचा अपघाताची बातमी)
चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त सज्ज (Chandrapur Ganesh Visarjan Bandobast)
चंद्रपूर शहरात आज अनंतचतुर्दशीला श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यापूर्वी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला, गणेश विसर्जन दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात हजार च्या वर पोलीस कर्मचारी सज्ज आहे.
पोलीस अधीक्षक नोपानी यांनी गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत पायदळ मार्च करीत पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. लाखोंच्या संख्येत शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी येतात, नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने गैरसोय होऊ नये याकरिता महिला पोलीस दल व गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक AI व्हॅन सज्ज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, आजच्या मिरवणुकीत डीजे चालक नियमांच्या अधीन राहून डीजे वाजविणार, जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस प्रशासन कारवाई करणार अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक नोपानी यांनी दिली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






