Chandrapur Liquor Ban Order अंतर्गत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिलेला मद्यविक्री बंदी आदेश

चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी सहा नगर परिषद हद्दीत मद्यविक्री बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 25, 2026

चंद्रपूर : Chandrapur Liquor Ban Order: सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा, चिमूर, भद्रावती व ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. राजुरा, मूल, वरोरा व चिमूर तालुक्यात २६ सप्टेंबर रोजी, तर भद्रावती व ब्रह्मपुरी तालुक्यात २७ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२(१) अन्वये हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (विसर्जन मिरवणुकीत नियम पाळा, अन्यथा कारवाई, वाचा महत्वाची बातमी)

चंद्रपुरात गणेश विसर्जनासाठी मद्यविक्री बंदीचा आदेश Chandrapur Liquor Ban Order

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा, चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या संबंधित दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा व चिमूर तालुक्यात 26 सप्टेंबर रोजी, तर भद्रावती व ब्रह्मपुरी तालुक्यात 27 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संबंधित नगर परिषद हद्दीतील किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशानुसार 26 सप्टेंबर  रोजी संपूर्ण दिवस राजुरा, मूल, वरोरा आणि चिमूर नगर परिषद हद्दीतील, तर 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील एफएल-२, सीएल/एफएल/टीओडी-३, एफएलबीआर-२, एफएल-३ आणि सीएल-३ या किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील.

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचा अथवा नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment