महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ऊर्जानगर तर्फे निर्भय मार्निंग वॅाकचे आयोजन

News34

ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली.

त्यानिमित्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर व शाखा ऊर्जानगरच्या वतीने वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र येथे निर्भय मार्निंग वॅाकचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वा कामगार मनोरंजन केंद्र येथून निघून ते सौदामिनी चौकातून सुपर एफ चौक मार्गे परत स्नेहबंध चौक कडून योग भवन मार्गे कामगार मनोरंजन केंद्र येथे महा अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाने समारोप करण्यात आला.

या मार्निंग वॅाकच्या वेळी अमर रहे अमर रहे शहीद दाभोळकर अमर रहे, विवेकाचा आवाज बुलंद करूया, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर ,आवाज दो हम एक है अशा विविध घोषणा देत निर्भय मार्निंग वाक घेण्यात आले. नंतर कामगार मनोरंजन केंद्र येथे शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांना अभिवंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण,ऊर्जानगर शाखेचे अध्यक्ष मुरलीधर राठोड, कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर,सचिव बाळकृष्ण सोमलकर,माजी अध्यक्ष राजा वेमुला,दूरेंद्र गेडाम,संजय जुनारे,विजय राठोड, अशोक खाडे, नितीन राव,अक्षय राठोड,प्रेषित चव्हाण तसेच अंनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!