चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून आमदार जोरगेवार पुन्हा येणार नाही – विजय वडेट्टीवार

News34

चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उदघाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. विशेष म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील आमदार किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार हा कांग्रेस पक्षाचा असेल.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार होते तर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.  कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांमध्ये दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती होती.

अभ्यासिकेचे उदघाटन झाल्यावर विरोधी पक्षनेते यांनी दिवंगत खासदार धानोरकर यांना आदरांजली देत, त्यांच्या शिक्षण धोरणाबाबत असलेल्या कार्याचा उजाळा दिला, सोबतच सदर अभ्यासिकेला आमदार व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके अभ्यासिकेला उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी केली.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढे विजय वडेट्टीवार यांनी राजकीय फटकेबाजी करीत चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत पुढचे आमदार म्हणून किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार कांग्रेस पक्षाचा असेल असे वक्तव्य केले, त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जोरगेवार बघतच राहिले.

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींसाठी समर्पित असलेल्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा एक प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील दानशूर शिक्षणप्रेमीनी स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराने केले आहे.

आयोजित अभ्यासिका कार्यक्रमात परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!