चंद्रपूर – River View Hotel Raid प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायाविरोधातील पोलिसांची कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे. रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अंधारी नदीजवळील रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धाड टाकत 10 जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत 5 लाख 12 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक)
River View Hotel Raid मध्ये नेमके काय घडले?
रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंधारी नदीजवळील रिवर व्यू हॉटेलमध्ये काही इसम मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या मुखबिराकडून मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर आणि मूल येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तात्काळ व्यूहरचना आखून हॉटेलवर अचानक धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळणाऱ्या एकूण १० जणांना वेढा घालून ताब्यात घेतले, ज्यामध्ये भाऊसाहेब केशव मडके (रा. गडचिरोली) याच्यासह अन्य ९ इसमांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ४, ५ मजुका (महाराष्ट्र जुगार कायदा) आणि कलम ४९ BNS (भारतीय न्याय संहिता) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावरून ५ लाख १२ हजार १४० रुपयांची रोख रक्कम, ३०० रुपये किमतीचे ६ तास पत्त्यांचे पाकीट आणि १०० रुपये किमतीची एक जुनी वापरती दरी असा एकूण ५ लाख १२ हजार ५४० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे विशेष पथक आणि मूल येथील पथकाने संयुक्तपणे पार पाडली असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.