चंद्रपूर – Chandrapur Child Trafficking Case: चंद्रपुरातील बहुचर्चित कथित बाळ विक्री प्रकरणातील संशयित आरोपी सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना ७ जुलै रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला. १ जुलै रोजी रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे प्रकरण नागपूर येथील एका रुग्णालयातून जिरो एफआयआर द्वारे उघडकीस आले होते, ज्यामध्ये आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. (२ बाळांची विक्री, नवजात बाळाचा सौदा, बाळ विक्री प्रकरणाने गाजले चंद्रपूर)
Chandrapur Child Trafficking Case : सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना जामीन
चंद्रपुरातील कथित बाळ विक्री प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेल्या भाजप पक्षाच्या सायली येरणे व भाग्यश्री हांडे यांना न्यायालयाने ७ जुलै रोजी जामीन मंजूर केला आहे. दोन्ही आरोपी १ जुलै पासून कारागृहात होत्या. बाळ विक्री प्रकरणात दोन्ही महिला आरोपी या साक्षीदार असल्याची माहिती होती.
नागपुरातील रुग्णालयात चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी दाखल केले होते, प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाची विक्री होणार होती, तसा आरोपींचा बेत होता, मात्र डॉक्टरांच्या सतर्कतेने सदर प्रकरण उघडकीस झाले. नागपुरातून जिरो एफआयआर द्वारे सदर प्रकरण रामनगर पोलिसात पोहोचले, पोलिसांनी ४ जणांना अटक केली. ज्यामध्ये ३ महिलांचा समावेश होता.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर प्रकरण उघडकीस आले, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला होता, बाळ विक्री प्रकरणात तत्पूर्वी २ बाळांची विक्री तेलंगणा व चंद्रपुरात झाली होती. या सौद्यात दोन्ही बाळांचा ४ लाखात विक्री करण्यात आली होती. या सौद्यात चंद्रपुरती भाजप पक्षाच्या सायली येरणे व भाग्यश्री हांडे दोघे साक्षीदार असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.
दोन्ही महिलांना १ जुलै रोजी अटक करीत न्यायालयात रवानगी करण्यात आली, आठवडाभरानंतर न्यायालयाने ७ जुलैला दोघांचा जामीन मंजूर केला, सध्या तरी या बाळ विक्री प्रकरणी पोलिसांकडे नवी माहिती उघड झालेली नाही. मात्र या प्रकरणानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






