Chandrapur Child Trafficking Case

चंद्रपूर बाळ विक्री प्रकरण: भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 2, 2026

चंद्रपूर – चंद्रपुरात (Chandrapur Child Trafficking Case) या खळबळजनक प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. पैशाच्या हव्यासापोटी पोटच्या नवजात मुलाची विक्री करणाऱ्या अवैध सौद्याला कायदेशीर स्वरूप देणाऱ्या भाजपच्या दोन कट्टर महिला कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. या कारवाईमुळे चंद्रपूरच्या स्थानिक राजकीय वर्तुळात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यापूर्वीच मुख्य आरोपींना अटक केली होती. (दोन मुलांची विक्री, नवजात बाळाचा सौदा)

पोटच्या मुलाला पैश्याच्या हव्यासापोटी विक्री करणारे प्रकरण रामनगर पोलिसांनी उघडकीस आणले होते, आता त्याच प्रकरणी पोलिसांनी या अवैध सौद्याला वैद्य स्वरूप देणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना बुधवारी अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

(Chandrapur Child Trafficking Case) अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई

मे महिन्यात झिरो एफआयआर ने नवजात बाळ विक्रीचे प्रकरणाचे बिंग फुटले होते, या प्रकरणी १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा पीडित मुलीच्या आईचा प्रियकर अजय फुलझेले सह अल्पवयीन मुलीची आई व बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे. तब्बल महिनाभरानंतर रामनगर पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासात इत्यंभूत माहितीच्या आधारे आमदार किशोर जोरगेवार यांच्या गोटातील कट्टर कार्यकर्त्या सायली येरणे व भाग्यश्री हांडे यांना अटक करण्यात आली.

मानव तस्करीच्या या गंभीर अश्या प्रकरणात भाजप सारख्या राजकीय पक्षाच्या महिलांचा सहभाग असणे हि बाब स्थानिक आमदाराला धक्का देणारी आहे, सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार नवजात बाळ विक्री सौद्यात भाजप महिला कार्यकर्त्या सायली येरणे व भाग्यश्री हांडे ह्या दोघीनी साक्षीदार म्हणून आपली भूमिका बजावली होती, म्हणजेच अवैध कामाला वैद्य करण्याचा हा प्रकार होता.

बुधवारी दोन्ही महिला आरोपीना पोलीस ठाण्यात चौकशी करीत अटक करण्यात आली, न्यायालयासमोर आरोपीना हजर केले, न्यायालयाने दोघीना न्यायालयीन कोठडी सुनावली. चंद्रपुरात मुनगंटीवार-जोरगेवार यांचा आपसी संघर्ष सध्या उफाळून आला आहे. नुकतीच भाजपची जिल्हा ग्रामीण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती, या निर्णयामुळे आमदार मुनगंटीवार यांना मोठा झटका बसला मात्र नवजात बाळ विक्री प्रकरणात आमदार जोरगेवार यांच्या कट्टर कार्यकर्त्यांना अटक म्हणजे आमदाराला सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीत भाग्यश्री हांडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभव झाल्यावर त्या पुन्हा भाजपात परतल्या.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment