चंद्रपूर : Arun Lakhani MLC म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाल्याने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांचा विजय निश्चित झाला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या अनुभवाचा लाभ तीनही जिल्ह्यांच्या विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला. (८१ लाख महिला अपात्र, खासदार धानोरकर यांचा सरकारवर घणाघात)
Arun Lakhani MLC निवड कशी निश्चित झाली?
विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
या निवडीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीर्घकाळ काम करताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी केलेले योगदान लक्षात घेता त्यांची विधान परिषदेसाठी झालेली निवड ही पक्षाच्या विश्वासाची पावती असल्याचे मानले जात आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, “अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर होणार असलेली बिनविरोध निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी निश्चितच होईल. विधान परिषदेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.”
यावेळी आमदार जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now





