BJP Expels Sayali Yerne बाळ विक्री प्रकरणानंतर भाजपची हकालपट्टी

सायली येरणे यांची भाजप पक्षातून हकालपट्टी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 3, 2026

चंद्रपूर – (BJP Expels Sayali Yerne) या घडामोडीने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बाळ विक्री प्रकरणात नाव समोर आल्यानंतर भाजपने सायली येरणे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाने निष्पक्ष चौकशीला पाठिंबा देत कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. (नवजात बालक विक्री प्रकरणात SIT चौकशीची भाजपची मागणी)

चंद्रपुरात सध्या नवजात बाळ विक्री प्रकरणाने प्रचंड खळबळ उडवून दिली असून, या प्रकरणात अटक झालेल्या राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. १ जुलै रोजी रामनगर पोलिसांनी या प्रकरणी सायली येरणे यांना अटक केली, ज्यानंतर स्थानिक राजकीय वातावरण कमालीचे तापले. २ जुलै रोजी दिवसभर सायली येरणे यांच्या नावाची आणि त्यांच्या या प्रकरणातील कथित सहभागाची सर्वत्र चर्चा रंगली होती.

BJP Expels Sayali Yerne : भाजपने तातडीने हकालपट्टी का केली?

या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने तातडीने कठोर पाऊल उचलले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार आणि महानगर प्रभारी अर्चना डेहनकर यांच्या निर्देशानुसार सायली येरणे यांची भाजप पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून, सर्वच राजकीय पक्षांनी पोलीस अधीक्षकांना निवेदने देऊन या प्रकरणाची अत्यंत निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात भाजप महिला आघाडीनेही आक्रमक भूमिका घेत, पोलीस अधीक्षक नोपानी यांच्याकडे निवेदनाद्वारे या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि या रॅकेटचे संपूर्ण धागेदोरे उघडकीस आणण्याची मागणी केली आहे.

या कथित बाळविक्री प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल शोध घेऊन पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी स्पष्ट भूमिका भाजप पक्षाने घेतली आहे. याच भूमिकेला अनुसरून, बाळ विक्री प्रकरणात नाव येताच भाजपने सायली येरणे यांच्यावर तात्काळ हकालपट्टीची कारवाई करत पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment