Dharmendra Pradhan Resignation News - धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

विद्यार्थ्यांच्या आक्रोशापुढे सरकार झुकले; धर्मेंद्र प्रधान पायउतार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 25, 2026

नवी दिल्ली : Dharmendra Pradhan Resignation News या अत्यंत मोठ्या घडामोडीत देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राजकीय दबावानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. (हे हि वाचा – विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्या चंद्रपूरच्या खासदार)

जंतर-मंतर ते विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि लाठीचार्ज

NEET-UG परीक्षेतील गोंधळ आणि अनियमिततेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. पोलीस लाठीचार्ज आणि आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अखेर चौफेर कोंडी झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश, रस्त्यावरील संघर्ष आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आक्रमक धरणे आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकणे भाग पडले आहे. सलग ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलन आणि वाढत्या राजकीय दबावानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नीट (NEET-UG) परीक्षेतील अनियमितता आणि त्यावरून पेटलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

जंतर-मंतर ते विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि लाठीचार्ज

३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. सुरुवातीला प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र परीक्षा माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध देशभरातून लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गेल्या ३५ दिवसांत या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २५ दिवस आमरण उपोषण केले. दिल्लीच्या जंतर-मंतरपासून ते विविध राज्यांच्या राजधानींपर्यंत विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मार्च, निदर्शने आणि देशव्यापी संप पुकारला होता. या आंदोलन दरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्जही करण्यात आला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. पोलिसांच्या या अमानुष कारवाईमुळे विद्यार्थ्यांचा रोष अधिकच भडकला. यातच कॉक्रोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांच्या बाजूने मैदानात उतरून जंतर-मंतरवर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रातील ५ महत्त्वाचे मुद्दे

अखेर चौफेर कोंडी झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. पत्रात त्यांनी नमूद केले की, गेल्या चार दशकांपासून ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांसाठी समर्पित राहिले आहेत. ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने दखल घेत हे प्रकरण सीबीआय (CBI) तपासाकडे सोपवले, परीक्षा रद्द केली आणि पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा संगणक आधारित (CBT Mode) घेण्याचा निर्णय घेतला.

राजीनामा पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, २१ जून २०२६ रोजी पुन्हा परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आली आणि १६ जुलै रोजी त्याचे निकालही घोषित झाले, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतील मेधावी विद्यार्थ्यांना यश मिळाले. परंतु, गेल्या १० दिवसांतील घटनाक्रम पाहून आपले मन अत्यंत दुःखी झाल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे. जंतर-मंतर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, भारताच्या कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर पेचात अडकू नये आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासावर व करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या विचाराने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशाची युवाशक्ती हीच खरी ताकद असून त्यांना भ्रमाच्या कुचक्रात फसू देणार नाही, असा संकल्पही त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

लाखो विद्यार्थ्यांचा एल्गार, अमानुष लाठीचार्ज आणि राजकीय पक्षांच्या धरणे आंदोलनानंतर ३५ दिवसांनी झालेली ही गच्छंती केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील ढिसाळ कारभारावर आणि परीक्षा यंत्रणेवरील अविश्वासावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment