चंद्रपूर – MLC Unopposed Election मुळे चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे अरुण लाखानी यांची निर्विरोध निवड निश्चित झाली. उमेदवारी माघारीनंतर काँग्रेसमध्ये नाराजी, घोडेबाजाराच्या चर्चा आणि नगरसेवकांना आमिष दाखवल्याचे आरोप यामुळे हा निवडणूक निकाल अधिक चर्चेत आला आहे. (अरुण लाखनी निर्विरोध, आमदार जोरगेवारांनी केले अभिनंदन)
MLC Unopposed Election मध्ये काय घडले?
कांग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेताच पक्षाला धक्का दिला, अर्ज माघार घेताच अग्रवाल म्हणाले कि उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच कांग्रेसच्या नगरसेवकांना पैश्याचे आमिष दिल्या गेले, आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ नव्हते, जर मी माघार घेतली नसती तर घोडेबाजाराला वाव मिळाला असता. त्यामुळे मी अर्ज मागे घेत आहो अशी प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली.
भाजपचे अरुण लाखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहे हे विशेष. कांग्रेसतर्फे आमदार विजय वडेट्टीवार हे निवडणूक निरीक्षक होते, मात्र त्यांच्याच नगरसेवकांनी साथ सोडत भाजपच्या गोटात सामील झाले. यामुळे कांग्रेस पक्षाकडे असलेले संख्याबळ अत्यंत तुल्यबळ झाले होते.
९७७ मतदारांच्या या विधानपरिषद क्षेत्रात ४० स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ४६९ मतदार, वर्धा २६४ तर गडचिरोली जिल्ह्यात २४४ मतदार आहे. मात्र यंदा ते मतदानापासून वंचित राहिले. विशेष बाब म्हणजे अर्ज माघारी घेतेवेळी अग्रवाल हे एकटेच आले होते त्यांच्यासोबत स्थानिक नेते नसल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे.
नगरसेवक मतदारांना घोडेबाजाराचा लाभ झाला मात्र काहींना त्या बाजारात मोल मिळाले नसल्याने नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. चर्चा अशी आहे कि नेत्यांनी दुसऱ्या पक्षाकडून आलेले पैसे आपल्या नगरसेवकांना वाटले. मात्र या चर्चेत नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.