Water Tank Pit मुळे विठ्ठल मंदिर प्रभागात नागरिकांचा संताप

Water Tank Pit: जीवघेणा खड्डा बुजवा; नागरिकांचा 7 दिवसांचा अल्टिमेटम

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 4, 2026

चंद्रपूर : Water Tank Pit प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात संतापाची लाट उसळली आहे. अभ्यंकर शाळेजवळ पाण्याच्या टाकीसाठी खोदलेला मोठा खड्डा अनेक महिन्यांपासून उघडाच पडून असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन देत 7 दिवसांत काम सुरू करण्याची किंवा खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा त्या खड्ड्यात उतरून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (रोजगारासाठी कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण)

Water Tank Pit मुळे नागरिकांमध्ये संताप का?

विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यंकर शाळेचा परिसर अत्यंत वर्दळीचा असून लहान मुलांच्या व नागरिकांच्या येण्या-जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. या ठिकाणी पाण्याच्या टाकीसाठी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे, मात्र प्रदीर्घ काळापासून हे काम रखडलेले असून खड्डा तसाच उघड्या व असुरक्षित अवस्थेत पडलेला आहे. मनपाच्या या ढिसाळ आणि संथ कारभारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला असून, पाऊस सुरू होताच या खड्ड्यात पाणी साचेल. शाळा जवळच असल्याने लहान मुले, पादचारी आणि वाहनचालक यांना पाण्याचा अंदाज न आल्यास येथे एखादी मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मनपा प्रशासनाने पुढील ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी किंवा तो खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करावा. या मुदतीत कारवाई न झाल्यास प्रभागातील संतप्त नागरिकांसह मनपा समोर तीव्र उपोषण करण्यात येईल आणि या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी काँग्रेस नेते बलवीर सिंग, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राधा पुलगमकर, प्रफुल पुलगमकर, अतुल पिंपळकर, मनिष दास, गुंजन येरमे, अतुल ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment