WCL Protest Chandrapur आंदोलनादरम्यान बेरोजगार युवकांचे मुंडण आंदोलन

WCL Protest Chandrapur । कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण, रोजगारासाठी मुंडन आंदोलन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 2, 2026

WCL Protest Chandrapur : चंद्रपूर – स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य, कामगार हक्कांचे संरक्षण तसेच विविध १२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या बेरोजगार युवकांनी मुंडण करून वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. (चंद्रपुरात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का, विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा)

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगारात प्राधान्य दिले जात नसून बाहेरील कामगारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात आहे. त्यामुळे स्थानिक युवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

WCL Protest Chandrapur मागे नेमका काय आहे वाद?

स्थानिक बेरोजगारांच्या रोजगाराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी अनेकदा बैठकींचे आयोजन केले. मात्र वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक वारंवार बैठकीस अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय आणि निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.

अनेक कंत्राटी कंपन्यांमधील कर्मचारी याद्या आणि रोजगारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे त्यांच्या ताब्यात आहेत. या पुराव्यांच्या आधारेच आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार अनेक कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांची संख्या अत्यंत नगण्य असून काही ठिकाणी ती बोटावर मोजण्याइतकीही नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. प्रकल्पामुळे होणारे परिणाम स्थानिक नागरिक सहन करत असताना रोजगाराच्या बाबतीत मात्र त्यांनाच डावलले जात असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर संतप्त युवकांनी आज मुंडण करून निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनाच जर वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासन किंमत देत नसेल, तर सामान्य बेरोजगारांच्या न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, उपोषण कर्ते रोशन हरबडे व नथू नवले यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने बेरोजगार युवक, कामगार, प्रकल्पग्रस्त आणि नागरिक उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment