Sagar Thakurwar Resignation : चंद्रपूर – चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना शिवसेना ठाकरे पक्षाला चंद्रपुरात मोठा धक्का बसला आहे. राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. (महाविकास युवक आघाडी चा भव्य घागर मोर्चा)
Sagar Thakurwar Resignation मुळे ठाकरे गटात चर्चा
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या काही भागात शिवसेना ठाकरे पक्ष मजबूत आहे त्याचे कारण म्हणजे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते, मात्र या कार्यकर्त्यांना वेळोवेळी सन्मान मिळत नसल्याची कुजबुज सुरु झाली आहे, या कुजबुजीत राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे कारण पत्रात नमूद केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या मतांची जुळवाजुळव सुरु आहे, मात्र या रणधुमाळीत विधानसभा प्रमुखाच्या राजीनाम्याची राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे, वैयक्तिक कारण कि राजीनाम्यामागे काही दुसरे कारण असेल अशी चर्चा पक्षात सुरु आहे.
सागर ठाकूरवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा सुद्धा राजीनामा दिला आहे, यामुळे काही प्रमाणात शिवसेनेचा राजुरा विधानसभा क्षेत्रात उभा राहिलेल्या किल्ल्याचा बुरुज ढासळला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ठाकूरवार यांनी राजीनाम्याचे पत्र जिल्हाप्रमुख गिऱ्हे यांना पाठविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






