Flood advisory : पूर बघायला जाण्यापूर्वी पोलीस अधिक्षकांची सूचना काय? जाणून घ्या

Flood advisory चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत असून जिल्ह्यातील मूल कडे जाणारे महामार्ग रस्ते पाण्याखाली आल्याने जड वाहतुकीचे आवागमन बंद झालेले आहेत. सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर ते मूल मार्ग, पोम्भूर्णा ते मूलमार्ग, गोंड पिंपरी ते मुल मार्ग बंद, चंद्रपूर ते गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाले आहे.

अवश्य वाचा : अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी घोषित

Flood advisory यावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, पूरस्थिती मार्गावर पूर पाहण्यासाठी जाऊ नये, जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पूर आला आहे.

नुकतेच नागभीड तालुक्यातील पूर पाहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह दोन जण वाहून गेले त्यामुळे पूर पाहणाऱ्या हौशी नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी असे पूरस्थिती ठिकाणी जाऊन स्वतः व इतरांचे जीव धोक्यात टाकू नये असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नागरिकांना केले आहे.

त्याचप्रमाणे सर्व ट्रान्स्पोर्टर्स यांना आवाहन करण्यात येते की, जिल्ह्यातील मार्गाचे परिस्थिती जाणून वाहने रस्त्यावर पाठवावे अन्यथा रस्त्याच्या कडेला वाहने लावून प्रशासनास सहकार्य करावे. आपातकालीन परिस्थितीत चंद्रपूर पोलीस दलाचा हेल्पलाइन क्रमांक 112 तसेच चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172-272480, 251597 वर अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीकरिता संपर्क करावे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!