घुग्गुस – Ghuggus River Tragedy ने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. घुग्गुस शहरातील इंदिरानगर भागातील पाच मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून पोहण्यासाठी गेलेल्या या युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू ओढवला. बचाव पथकाने ९ जून रोजी सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश आणि परिसरातील दुःखद वातावरण पाहायला मिळाले. (नेत्यांसह नातेवाईक अवैध धंद्यात उतरले)
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर भागातील पाच मुलांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास म्हातारदेवी समोरील चांदूर गावातील वर्धा नदीकाठी पाचही मित्र पोहण्यासाठी गेली होती. मात्र, सायंकाळ उलटूनही मुले घरी परत न आल्याने घाबरलेल्या पालकांनी सर्वत्र शोध सुरू केला. शोध घेत असताना वर्धा नदीच्या काठावर मुलांचे कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने मुले नदीत बुडाल्याची तीव्र भीती व्यक्त करण्यात आली होती.
Ghuggus River Tragedy ने घुग्गुस शहराला हादरवले
९ जून रोजी सायंकाळपर्यँत पाचही मुलांचे मृतदेह मिळाल्याने घुग्गुस शहरात कुटुंबीयांचा आक्रोश बघायला मिळाला. मृतकात २० वर्षीय नकुल भास्कर केळझरकर, १७ वर्षीय रोहित बाबाराव बोबडे, १९ वर्षीय सम्यक देवराव सोनटक्के, १७ वर्षीय सन्नी आसमपेल्लीवार, १७ वर्षीय तन्मय नवनाथ पथाडे सर्व राहणार इंदिरानगर वॉर्ड घुग्गुस यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने या उकाड्यापासून काही प्रमाणात थंडावा मिळावा यासाठी हे पाच मित्र ८ जून रोजी दुपारच्या सुमारास नदी मध्ये पोहण्यासाठी गेले होते, यापूर्वी सर्वानी एकत्र येत आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला. सर्वानी आपले कपडे, चप्पल व मोबाईल नदी पात्राजवळ ठेवत, पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मित्र पाण्यात बुडू लागले. त्यांची मदत करणारा त्याठिकाणी कुणी नव्हता आणि काही वेळात पाचही मित्र पाण्यात बुडाले.
सायंकाळी मुले घरी आले नाही म्हणून पालकांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, रिंग वाजली मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मुले खेळायला गेली असावी असा अंदाज पालकांनी लावला, रात्रीचे ८ वाजल्यानंतर हि मुले घरी न आल्याने पुन्हा त्यांच्या मोबाईलवर पालकांनी संपर्क केला, अनेकदा कॉल करूनही समोरून काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मुलांचे मोबाईल बंद झाले पालकांमध्ये चिंता वाढली आणि स्वतः पालक आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर निघाले.
सर्वांची शोधमोहीम घेतली मात्र कुणाचा थांगपत्ता लागला नाही, अखेर नदी पात्रात काहींना त्यांचे कपडे, चप्पल व मोबाईल आढळल्याने मुले नदीत तर बुडाली नाही ना असा संशय व्यक्त करण्यात आला, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, बचाव पथकाला बोलाविण्यात आले, मात्र पाऊस सुरु झाला आणि शोध मोहिमेत अडचण निर्माण झाली. त्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.
९ जून रोजी सकाळपासून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली, सकाळी १० वाजताच्या सुमारास तन्मय पथाडे या मुलाचा मृतदेह बचाव दलाला मिळाला, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबाचा आक्रोश त्याठिकाणी बघायला मिळाला, दुपारपर्यंत पाच हि मुलांचे मृतदेह बचाव दलाने शोधून काढले. पाच हि मूल कुटुंबाचे लाडके होते. तन्मय पथाडे शाळेला सुट्ट्या लागल्याने ९ जून ला आजीच्या घरी जाणार होता मात्र नशिबाला काही ओर मंजूर होते. इंदिरा नगर भागात राहणारी पाच हसते कुटुंब आज अश्रूंच्या सागरात बुडाले.
सर्व मृतदेह मिळाल्यावर घटनास्थळ कुटुंबाच्या आक्रोशाने हादरून गेले, एकाच भागात राहणारे पाच मित्र अचानकपणे सोडून गेल्याने घुग्गुस शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
