Rajura Illegal Sand Mining in Chandrapur district

राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय नातेवाईकांकडून अवैध रेती उपसा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 9, 2026

चंद्रपूर – Rajura Illegal Sand Mining प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय नातेवाईकांकडून अवैध रेती उपसा होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. नव्या पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनंतरही काही भागात अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा असून महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभल्यावर अवैध धंद्यावर धडक कारवाईचे सत्र सुरु झाले, जिल्ह्यातील अवैध धंदेचालकांच्या मुसक्या आवळण्याचा काम आजपर्यंत एकाही पोलीस अधीक्षकांना जमले नाही ते नव्या पोलीस अधीक्षकांनी करून दाखविले. मात्र जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरु असलेले अवैध धंदे अजूनही जोमात सुरु झाले आहे. (वर्धा नदीत ५ मुलं बुडाले, ३ मुलांचे मृतदेह आढळले)

एकीकडे राजकारणात सत्ताधारी पक्षाने घराणेशाहीला विरोध केला मात्र या विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधी यांच्या घराणेशाही मधील नातेवाईक अवैध धंदे करू लागले आहे, यांच्यावर कारवाई करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Rajura Illegal Sand Mining चे आरोप का वाढले?

राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेतीचा मोठा उपसा करीत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला घोडा लावण्याचे काम राजकीय नातेवाईकांनी सुरु केले आहे. नेते स्मार्ट आणि क्लीन चारित्र्याचे आहे मात्र त्यांचे विवेक बुद्धी असणारे नेते आता रेती व कोळशाचे कामे जोमात करू लागले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विरोधक मात्र अवैध धंद्याच्या घराणेशाहीचे दृश्य गपचूप बघत विरोध न करता डोळे मिटण्याचे काम करीत आहे. विधानसभेच्या निवडणुका २ वर्षावरुन जुन्या झाल्या, विरोधकांनी वोट चोरीच्या मुद्द्यावर बोलणे आता टाळले आहे.

राजकीय नेत्यांना आता प्रत्येक अवैध कामात भागीदारी म्हणजे दलाली हवीहवीशी वाटायला लागली आहे, आपण निवडणूक कधी हरलो नाही आणि पुढेही हरणार नाही असा अतिसंभ्रम त्यांच्या डोक्यात शिरला आहे. एक-दोन दारूच्या बाटल्या स्वतः पकडायच्या त्याची रील बनवायची हा गोरखधंदा या क्षेत्रातील नेते करीत आहे.

पोलिसांनी अवैध धंद्याची पाठराखण करणाऱ्या नेत्याची पाठ लाल करून हे अवैध धंदे बंद करायला हवे अशी मागणी आता थेट जनतेच्या मुखातून होऊ लागली आहे. अन्यथा राजुरा विधानसभा क्षेत्रात नेता, मामा, भाच्या व पुतण्या यांची अवैध धंदे घराणेशाहीवर वर्चस्व राहणार हे येणाऱ्या काळात दिसेलच. त्यामुळे संभ्रमित नेत्याला लवकरचं आपला भोंगळ कारभार बंद करावा लागेल.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment