चंद्रपूरमध्ये विधवा महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; ८३ महिलांची नोंदणी, रोजगाराच्या नव्या संधी

चंद्रपूर: Chandrapur Women Workshop अंतर्गत उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने विधवा महिलांसाठी विशेष कौशल्य विकास व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “नवी उमेद, नवी झेप” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत स्वयंरोजगार, डिजिटल साक्षरता, गृहउद्योग, बँक कर्ज सुविधा आणि व्यवसाय उभारणी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “नवी उमेद, नवी झेप” या विशेष संकल्पनेवर आधारित विधवा महिलांसाठी मार्गदर्शन व कौशल्य विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्थानिक पातळीवर आयोजित या उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (घुग्गुस शहरातील ५ मुलांचा नदीत बुडून मृत्यू)

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन तिरुपती प्रॉपर्टीचे संचालक श्री. संदीप भाऊ पोशेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मीनाक्षी शांता दादाराव भस्मे उपस्थित होत्या, तर चंद्रपूरचे डी.आय.सी. मॅनेजर श्री. बी. के. खरमाटे यांनीही उपस्थित राहून महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कृष्ट महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. छबुताई वैरागडे या होत्या.

Chandrapur Women Workshop ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमाची सुरुवात सौ. सोनाली राम धनमने यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून संस्थेने आजवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कौशल्य विकास उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, “नवी उमेद, नवी झेप” हा उपक्रम विधवा महिलांच्या जीवनात नवा प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच दरम्यान, संस्थेने लावणी या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव नोंदवून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यशाळेत उपस्थित महिलांना स्वयंरोजगार, हस्तकला, गृहउद्योग, शिवणकाम, ब्युटी पार्लर यासोबतच आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन डिजिटल साक्षरता, ऑनलाइन व्यवसाय आणि बँकेकडून कर्ज मिळवण्याबाबत सखोल आणि दिशादर्शक मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने एकूण २०० अर्जांचे वितरण करण्यात आले होते, ज्यापैकी ८३ अर्ज प्राप्त झाले असून या सर्व महिलांची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत सर्व महिलांना विविध विषयांचे दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा दृढ संकल्प संस्थेने केला आहे.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिल्पा कोंडावार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाच्या पदाधिकारी सौ. मेघा सागर अंदनकर, साक्षी कार्लेकर, किरण बल्की, संघटिका मनीषा भाके, माया खनके, सपना महावदीवार, सुवर्णा बेज्जलवार, योगिता धनेवार, अभिलाषा मैंदलकर, शितल कावडे, अर्चना चहारे, सुवर्णा लोखंडे, रंजना माणुसमारे, सुवर्णा उगेमुगे, प्रिया खनके, करीना वांढरे, सोनाली गुंडे, स्नेहा पोटदुखे, पूनम पोटदुखे, शालू कंदोजवार, तसेच परेश गहूकर, ओम वैरागडे, विवेक तोहगावकर आणि अर्चना वाढरे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेमुळे चंद्रपूर परिसरातील महिलांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला.

Advertisement
Advertisement

Leave a Comment