News34
गुरू गुरनुले
मूल- मुल येथील अंतरगाव पारडवाही शेत शिवारात अरुण श्रावण चौखुंडे यांचे स्वतःचे शेतात दि. १४ ऑगस्ट ला पट्टेदार वाघीण दोन पिल्लासह मूल हेटी येथील रहिवासी लक्ष्मण पाटील चौखुंडे यांची गायीवर हल्ला करून ठार केले.
या ठिकाणावरून अगदी किलोमीटर च्या आत शहर लागून असून संपूर्ण परिसर परिसर धान शेत असल्याने जंगल झाडे नाहीत पूर्ण खाली आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रात्रंदिवस फिरत असतात, त्यामुळे वाघ रात्रीच्या वेळेस गावात येणेही टाळता येत नाही.
सदर घटनेमुळे शहराच्या शेवट वास्तव्यास असलेल्या घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात धान शेत असल्याने रात्रौ पर्यंत शेतकरी शेतात ये जा करत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा घटनाकडे वनविभागाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा अनुचित प्रकार टाळता येणार नाही.
