News34
वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती
कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद आपले मास्तर प्रा.नितेश कराळे सर वर्धा यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सह इयत्ता १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ctv वरोरा लोकल चॅनेलचे भव्य उदघाटन आणि उन्माद विषमतेचा या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन आयुष नोपानी (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेशजी सोलापण जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर हे राहणार आहेत.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे, परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर, ॲड पुरुषोत्तम सातपुते ज्येष्ठ अधिवक्ता चंद्रपूर, प्रकाश बाबू मुथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माढेळी, धनराज पाटील आस्वले कार्यकारी अध्यक्ष, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, सुषमाताई श्री शिंदे, विश्वस्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल टेबल ट्रस्ट चंद्रपूर, शोभाताई वेले ज्येष्ठ कवयित्री नागपूर, सुधाकर कडू गुरुजी विश्वस्त ,महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा यांची उपस्थिती राहणार आहे.
आयोजित कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशफाक शेख अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा सुनिल शिरसाट सचिव, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा संजय तोगट्टीवार सचिव स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, हितेश राजनहिरे ,संघटक , महाराष्ट्र राज्य ग्रामीण मतदार संघ वरोरा अमर गोंडाने, सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा मुजाहिद कुरेशी ,फैज पटेल, विश्वदीप गोंडाने ,अजीम शेख, अहेफाज शेख यांनी केले आहे.
