बल्लारपूर गोल पुलिया परिसरात सुरू असलेल्या कामाची पाहणी

दोन वर्षांच्या अडचणीनंतर गोल पुलियावर काम सुरू होणार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 6, 2026

बल्लारपूर : बल्लारपूर गोल पुलिया परिसरातील गेल्या दोन वर्षांपासूनची वाहतुकीची समस्या आता दूर होण्याची शक्यता आहे. नागपूर-काझीपेठ तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे पुलियाचा विस्तार करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नगर परिषदेने याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून कामाला सुरुवात केली. (चंद्रपुरात चारा वाहतूक बंदी, वाचा हि बातमी)

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी २८ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष गोल पुलिया परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्यवस्थापकांशी (DRM) थेट संपर्क साधून हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

रेल्वे अधिकारी आणि प्रशासनाची संयुक्त पाहणी

खासदार धानोरकर यांच्या निर्देशांची तातडीने दखल घेत मंगळवारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विशेष पथक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोल पुलिया परिसरात संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान रेल्वेचे कार्यकारी अभियंता दिलीप सेलूकर, उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य, बांधकाम सभापती अब्दुल करीम शेख, पाणीपुरवठा सभापती इस्माईल ढकवाला, ज्येष्ठ नगरसेवक भास्कर माकोडे, बांधकाम विभागाचे मयूर दहीकर, कृष्णा गुलहाने, प्रणय वाटेकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी संदीप चौहान आणि खासदार प्रतिनिधी शेगावकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तसेच तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासून कामाला सुरुवात केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाने उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे गोल पुलिया परिसरातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार असून बल्लारपूरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment