chandrapur blood donor hero

चंद्रपूरचा खरा हिरो; जिद्दी बापाचा वैद्यकीय क्षेत्रात सत्कार!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर : (chandrapur blood donor hero) म्हणून चंद्रपूर चे ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र मशारकर यांनी समाजसेवेचा एक अद्भूत आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपले स्वर्गीय चिरंजीव कुशल याच्या जयंतीनिमित्त नुकतेच ७७ वे रक्तदान पूर्ण केले. सन २०२२ मध्ये मुलगा कुशलचे दुःखद निधन झाले होते. मात्र, या प्रचंड वैयक्तिक दुःखावर मात करून त्यांनी आपली ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. त्यांच्या या अनोख्या निष्ठेचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. (आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मानाचा शिवसन्मान पुरस्कार जाहीर)

chandrapur blood donor hero : ७७ व्या रक्तादानाचा टप्पा पार

रक्तदान हीच सर्वोत्तम समाजसेवा मानत चंद्रपूरचे पत्रकार जितेंद्र मशारकर यांनी आपल्या स्वर्गीय चिरंजीव कुशल यांच्या जयंतीनिमित्त ७७ वे रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

अनेक वर्षांपूर्वी मुलगा कुशलच्या वाढदिवशी रक्तदान करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प आजही ते तितक्याच निष्ठेने पाळत आहेत. सन २०२२ मध्ये मुलगा कुशलचे दुःखद निधन झाले, तरीही वैयक्तिक दुःखावर मात करत त्यांनी रक्तदानाची परंपरा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे चंद्रपूरमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती झाली असून अनेक युवक रक्तदानासाठी प्रेरित झाले आहेत.

त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करत रक्तदान चळवळीला त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

यावेळी रक्तकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. माधवी कांत मॅडम (आई), डॉ. स्वाती देरकर (रक्त संक्रमण अधिकारी), डॉ. कोमल झटाले (कनिष्ठ निवासी डॉक्टर), डॉ. राहुल मडावी (कनिष्ठ निवासी डॉक्टर), राकेश शेंडे (समाजसेवा अधीक्षक), सुप्रिया ताजने (समाजसेवा अधीक्षक), गुरुदेव कुनघाडकर, अमुल रामटेके आणि रुपेश डहाळे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते किसन नागरकर यांनीही उपस्थित राहून जितेंद्र मशारकर यांचे अभिनंदन केले.

जितेंद्र मशारकर यांचा रक्तदानाचा हा प्रेरणादायी प्रवास समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो—प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचे कार्य अखंडपणे सुरू ठेवता येते. त्यांच्या समर्पणामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून रक्तदानाविषयी जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment