chandrapur jagannath rathyatra

चंद्रपूर शहरात १६ जुलैला भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर : (chandrapur jagannath rathyatra) चे १६ जुलै २०२६ रोजी शहरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री महाप्रभु जगन्नाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा धार्मिक सोहळा रंगणार आहे. रथयात्रेची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक आणि दुपारी भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन मंदिरात केले आहे. (मुलाचा वाढदिवस, बाप्पाची जिद्द)

chandrapur jagannath rathyatra : धार्मिक विधींचे सविस्तर वेळापत्रक

श्री महाप्रभु जगन्नाथ बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने १६ जुलै २०२६ रोजी शहरात भव्य ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, भाविकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


रथयात्रेच्या दिवशी सकाळी विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. सकाळी ८.३० ते ९.३० अभिषेक, सकाळी ९.३० ते १० वाजता श्रृंगार आरती, सकाळी १० वाजता भोग, आरती आणि कीर्तन, सकाळी ११ वाजता मुख्य रथयात्रेचा प्रारंभ, दुपारी १२ वाजता विशेष भोग, कीर्तन आणि महाप्रसाद वितरण होणार आहे.


मुख्य रथयात्रा दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत काढली जाईल. ही रथयात्रा कृष्णा नगर दुर्गा माता मंदिर येथून सुरू होईल. पुढे बंगाली कॅम्प चौक, बंगाली कॅम्प दुर्गा माता मंदिर, शितला माता मंदिर आणि सावरकर चौक या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा कृष्णा नगर दुर्गा माता मंदिर येथे तिचा समारोप होईल. तसेच सकाळी ११ ते १२ या वेळेत कृष्णनगर भागात स्थानिक नगर यात्रा काढण्यात येणार आहे.
रथयात्रेच्या समाप्तीनंतर रात्री ८ वाजेपासून ‘कृष्णा नगर दुर्गा माता मंदिर’ येथे भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाल, सचिव तापोश डे, कोषाध्यक्ष तारोनीकांत सरकार, उपाध्यक्ष निखिल बिस्वास आणि सहकोषाध्यक्ष मनोज बारई यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment