चंद्रपूर: Chandrapur Dahihandi 2026 चा भव्य थरार आज शहरात अनुभवता येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या वतीने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तुकूम येथील गुरूव्दारा रोडवर आज सायंकाळी ५ वाजता हा उत्सव सुरू होईल. तिरंगा क्रिकेट क्लब व शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्था या सोहळ्याचे सहआयोजक आहेत. (हे हि वाचा – बल्लारपुरात पहिले आरोग्य साहित्य संमेलन)
विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल ५५,५५५ रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासोबतच तरुणांसाठी खास रील स्पर्धाही रंगणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच तिरंगा क्रिकेट क्लब व शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्था, तुकूम यांच्या सहकार्याने आज चंद्रपूर शहरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जल्लोषपूर्ण कार्यक्रम आज, शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता तुकूम येथील गुरूव्दारा रोडवर रंगणार आहे. शिवसेना महानगर प्रमुख सुरेशभाऊ पचारे आणि युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या मुख्य आयोजनाखाली ही दहीहंडी स्पर्धा पार पडणार असून, विजयी गोविंदा पथकाला इंजिनिअर गौतम नागदेवते यांच्या सौजन्याने तब्बल ₹५५,५५५/- चे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
सध्याच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणाईचा वाढता कल लक्षात घेऊन या उत्सवादरम्यान एका विशेष ‘रील स्पर्धे’चेही आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान सर्वोत्तम, उत्स्फूर्त आणि दर्जेदार रील तयार करणाऱ्या सोशल मीडिया क्रिएटर्सना आयोजकांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येईल. गोविंदांच्या मानवी थरांचा थरार आणि रील स्टार्सची सर्जनशीलता यामुळे या उत्सवात दुहेरी रंगत पाहायला मिळणार असून, चंद्रपुरातील नागरिक, तरुण वर्ग आणि शिवसैनिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






