Chandrapur Single Women Survey registration initiative by CCMC

चंद्रपूर मनपाचा पुढाकार: शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू; विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 17, 2026

चंद्रपूर : Chandrapur Single Women Survey मोहिमेला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने अधिकृतरीत्या सुरुवात करण्यात आली आहे. ‘सशक्त महिला, सशक्त समाज, समृद्ध शहर’ या संकल्पनेतून शहरातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच अविवाहित महिलांची माहिती संकलित केली जात आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे शहरातील गरजू महिलांना थेट शासकीय योजना, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेचा लाभ मिळवून देणे प्रशासनाला सुलभ होणार आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांच्या दणक्यानंतर वेकोलि नमली)

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘सशक्त महिला, सशक्त समाज, समृद्ध शहर’ या संकल्पनेअंतर्गत शहरातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व अविवाहित एकल महिलांची माहिती संकलित करण्यासाठी ‘एकल महिला सर्वेक्षण नोंदणी’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकल महिलांची अचूक माहिती उपलब्ध होऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ, आर्थिक व सामाजिक सहाय्य, आरोग्य सुविधा, शिक्षण व कौशल्य विकास, सुरक्षा व संरक्षण तसेच सामाजिक समावेशन यांसारख्या सुविधांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिका प्रशासनामार्फत उपलब्ध होणाऱ्या या माहितीच्या आधारे एकल महिलांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन व आवश्यक उपाययोजना करण्यास सहाय्य मिळणार आहे.

चंद्रपूर शहरातील पात्र विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व अविवाहित एकल महिलांनी सर्वेक्षणात सहभागी होऊन आपली माहिती नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत सर्वेक्षण लिंकवर माहिती भरता येईल. तसेच दिलेला QR कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येणार आहे.

सर्वेक्षण लिंक :
https://survey.ccmcchandrapur.com/

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment