Majri WCL Workers Meeting मध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्यानंतर वेकोली नमली; महिला कर्मचाऱ्यांच्या रविवार ड्युटीसह विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 17, 2026

चंद्रपूर : Majri WCL Workers Meeting चंद्रपुरातील कुचना येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात पार पडली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेकोलीचे जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांच्यासोबत माजरी क्षेत्रातील कामगार व महिला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. महिलांच्या रविवार सुट्टी, रेस्ट शेल्टर, रस्ता दुरुस्ती व वैद्यकीय सुविधांचे मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात आले. प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

माजरी क्षेत्रातील कामगार व महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि अत्यंत गंभीर प्रश्नांसंदर्भात आज कुचना येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड चे जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेकोली परिसरातील कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Majri WCL Workers Meeting: बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले?

सदर बैठकीत मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला महिला कर्मचाऱ्यांच्या रविवारच्या (सुट्टीच्या दिवशी ) ड्युटीचा प्रश्न आणि खाण परिसरातील अपुऱ्या रेस्ट शेल्टरमुळे महिला कर्मचाऱ्यांना होणारी गंभीर गैरसोय यावर वेकोली प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तसेच अन्यायाबाबत ताकीद देण्यात आली. यासोबतच माजरी क्षेत्रातील सर्व उपक्षेत्रांमध्ये कार्यरत महिला श्रमिकांना रविवारची ड्युटी प्रदान करणे आणि वैकल्पिक कार्यात कार्यरत श्रमिकांची तपासणी करून त्यांनाही रविवार ड्युटीचा हक्क देणे याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

न्यू माजरी UG2 OC खाणीचा धोकादायक अप्रोच रोड

याशिवाय, न्यू माजरी UG २ OC खाणीकडे जाणारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरलेला अप्रोच रोड त्वरित दुरुस्त करणे, खाण परिसरात महिलांसाठी बनवण्यात आलेल्या लहान रेस्ट शेल्टरचा विस्तार करून ते सुसज्ज उभारणे आणि श्रमिकांच्या प्रत्यक्ष कार्यस्थळापर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय पूर्ण करणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. माजरी क्षेत्रीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता दूर करून तेथे हाडांचे तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ व फिजीशियन यांची तातडीने नियुक्ती करावी किंवा डॉक्टराना प्यानल मध्ये ठेवण्यात यावे. माजरी निवासी संकुलातील घरांची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम पूर्ण करावे अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच एकोना खाणींमधून उच्च दाबाची ब्लास्टिंग होत असल्यामुळे त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. 

सदर बैठकी दरम्यान वेकोली प्रशासनाने कामगारांच्या आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत, मांडलेल्या सर्व विषयांवर व प्रलंबित मागण्यांवर तातडीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांनी दिले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment